LIC ची नवी पाॅलिसी, रोज 28 रुपये करा जमा आणि मिळवा लाखो रुपये

LIC ची नवी पाॅलिसी, रोज 28 रुपये करा जमा आणि मिळवा लाखो रुपये

LIC, Micro Bachat plan - LIC नवी पाॅलिसी घेऊन आलीय. कमी उत्पन्न असलेल्यांसाठी ही विमा पाॅलिसी आहे

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : भारतीय जीवन विमा (LIC ) घेऊन आलीय एक नवा इन्शुरन्स प्लॅन. हा आहे मायक्रो बचत. काही दिवसांपूर्वी हा प्लॅन लाँच केलाय. याची बरीच वैशिष्ट्य आहेत. या इन्शुरन्स प्लॅनमध्ये 50 हजार रुपयांपासून 2 लाख रुपयांपर्यंत विमा मिळेल. हा नाॅन लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन आहे आणि या प्लॅनवर कर्जाची सुविधा मिळेल. हा प्लॅन म्हणजे सुरक्षा आणि सेव्हिंग यांचं काॅम्बिनेशन आहे. अचानक मृत्यू झाला तर कुटुंबाला यातून संरक्षण मिळतं. शिवाय पाॅलिसी म्यॅच्युअर झाली की एकरकमी रक्कम मिळू शकते.

कोण घेऊ शकतो प्लॅन?

शारीरिकदृष्ट्या निरोगी असणारे या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

प्लॅन घेण्यासाठी 18 वर्ष पूर्ण हवेत.

55 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर अर्ज करू नये.

या प्लॅनसाठी वैद्यकीय तपासणी लागत नाही.

3 ते 5 वर्षाचा नोकरीचा अनुभव आहे? मग पुढच्या 6 महिन्यांत अशी मिळेल मोठी संधी

मॅच्युरिटीचा फायदा

या प्लॅनच्या मॅच्युरिटीवर पाॅलिसी होल्डरला एक रकमी रक्कम मिळेल. समजा पाॅलिसीधारकाचा मृत्यू झाला तर कुटुंबाला विम्याची पूर्ण रक्कम मिळेल. कोणी 3 वर्ष प्रीमियर भरला असेल तर त्याला मायक्रो बचत प्लॅनमध्ये कर्जाची सुविधा मिळेल.

LIC ची सर्वोत्तम पाॅलिसी, रोज फक्त 9 रुपये खर्च आणि लाखोंचा फायदा

किती द्यावा लागणार प्रीमियम?

मायक्रो बचत प्लॅनमध्ये 10, 12 आणि 15 वर्षापर्यंत प्रीमियम भरण्याची सोय आहे. अशा प्रकारे 18 वर्षाचा कुणीही व्यक्ती 15 वर्षाचा प्लॅन घेत असेल तर त्याला प्रति हजार 51.5 रुपये प्रीमियम द्यावा लागेल.25 वर्षाच्या व्यक्तीला 51.60 रुपये प्रति हजाराच्या मागे द्यावे लागतील. वार्षिक प्रीमियममध्ये 2 टक्के सूटही मिळेल. खरेदी केल्यानंतर इन्शुरन्स आवडला नाही तर 15 दिवसांच्या आत प्लॅन सरेंडर करता येतो.

सायन्स ग्रॅज्युएट्सना राज्याच्या प्रकल्पात मोठी व्हेकन्सी,असं असेल कामाचं स्वरूप

कर्जाची सुविधा

मायक्रो बचत प्लॅन घेऊन 3 वर्ष झाली की तुम्ही त्यावर कर्जही घेऊ शकता.

इन्कम टॅक्स सेशन 80C अनुसार करात सवलत मिळेल.

पाण्यात नको ते धाडस करू नका, दुचाकीस्वार वाहून गेल्याचा थरारक VIDEO

Published by: Sonali Deshpande
First published: July 26, 2019, 5:02 PM IST
Tags: LIC

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading