मराठी बातम्या /बातम्या /मनी /रोज 76 रुपयांची बचत करून मॅच्युरिटीवेळी मिळतील 10 लाख, काय आहे LIC ची ही पॉलिसी

रोज 76 रुपयांची बचत करून मॅच्युरिटीवेळी मिळतील 10 लाख, काय आहे LIC ची ही पॉलिसी

LIC New Jeevan Anand Policy: LIC च्या या पॉलिसीअंतर्गत तुम्हाला 76 रुपयांची रोज बचत करावी लागेल. जाणून घ्या काय आहे योजना

LIC New Jeevan Anand Policy: LIC च्या या पॉलिसीअंतर्गत तुम्हाला 76 रुपयांची रोज बचत करावी लागेल. जाणून घ्या काय आहे योजना

LIC New Jeevan Anand Policy: LIC च्या या पॉलिसीअंतर्गत तुम्हाला 76 रुपयांची रोज बचत करावी लागेल. जाणून घ्या काय आहे योजना

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर: LIC कडून नेहमी गुंतवणूकदारांना चांगल्या भविष्यासाठी बचत करण्याची संधी दिली जाते. एलआयसीची न्यू जीवन आनंद पॉलिसी (LIC New Jeevan Anand Policy) ग्राहकांना केवळ बचत करण्याची संधी देत ​​नाही, तर सुरक्षा देखील प्रदान करते. तुम्हाला या योजनेअंतर्गत बोनस मिळेल. या योजनेअंतर्गत रिस्क कव्हर पॉलिसीच्या मुदतीनंतरही चालू राहते. पॉलिसी अंतर्गत तुम्हाला दररोज फक्त 76 रुपये वाचवावे लागतील. जाणून घ्या या योजनेबाबत सर्वकाही..

एलआयसीच्या नवीन जीवन आनंद पॉलिसीमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतात. या पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात तुम्हाला लाइफ टाइम कव्हर मिळेल. यासह, बोनसचा लाभ देखील दिला जातो. या पॉलिसीमध्ये तुम्ही आयुष्यभर सुरक्षित असाल.

कुणाला काढता येईल ही पॉलिसी?

तुमचे वय जर 18 वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला ही पॉलिसी खरेदी करता येईल. शिवाय ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी कमाल मर्यादा 50 वर्षे आहे. यापेक्षा जास्त वय असल्यास तुम्हाला ही पॉलिसी खरेदी करता येणार नाही. या स्कीमअंतर्गत कमीतकमी एक लाखाची सम अश्योर्ड घेणे आवश्यक आहे. सम अश्योर्डसाठी अधिकाधिक मर्यादा नाही आहे.

हे वाचा-Petrol-Diesel Price Today: मंगळवारच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर काय आहे आजचा भाव

कशाप्रकारे मिळवाल 10 लाख रुपये?

>> सम अश्योर्ड + सिंपल रिव्हर्सनरी बोनस + फायनल अॅडिशनल बोनस

>> 5 लाख + 5.04 लाख + 10 हजार = 10.14 लाख

>> 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीधारक हयात असल्यास  त्याला 10 लाखपेक्षा जास्त रक्कम मिळेल.

कॅलक्यूलेशन घ्या समजून

पॉलिसीमध्ये 15 वर्षांच्या सतत गुंतवणुकीनंतर गुंतवणूकदारांना बोनस देखील मिळतो. यामध्ये, गुंतवणूकदाराला रोज 76 रुपये गुंतवून मॅच्युरिटीवर 10.33 लाख रुपये मिळू शकतात. जर 24 वर्षांच्या आसपास तुम्ही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये 5 लाख रुपयांचा पर्याय निवडला तर तुम्हाला 26,815 रुपये प्रीमियम भरावा लागेल. दरमहा हा प्रीमियम 2281 रुपये होईल, अर्थात हा प्रीमियम दर दिवसाला 76 रुपये होईल.

हे वाचा-सरकारी योजनेत फक्त 420 रुपये भरून मिळवा दरमहा 10000 रुपये; जाणून घ्या खास स्कीम

पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर जर विमाधारकाचा मृत्यू झाला, तर या पॉलिसीत नॉमिनी असलेल्या व्यक्तीला विम्याची रक्कम म्हणजे 5 लाख रुपये मिळतील. जर कोणत्याही कारणास्तव पॉलिसीधारकाचा पॉलिसी सुरू असताना मृत्यू झाला तर नॉमिनीला विमा रकमेच्या 125% रक्कम मिळेल. यासह बोनस आणि अंतिम बोनस देखील मिळेल. र 17 वर्षांसाठी प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसीमध्ये मृत्यू असेल तर या तिघांमध्ये जे जास्त असेल ते नॉमिनीला देण्यात येईल.

First published:
top videos

    Tags: Investment, LIC, Savings and investments