LIC ची सर्वोत्तम पाॅलिसी, वर्षाला जमा करा 27 हजार, मिळतील 10 लाख रुपये

LIC ची सर्वोत्तम पाॅलिसी, वर्षाला जमा करा 27 हजार, मिळतील 10 लाख रुपये

LIC च्या काही योजना बचतीसाठी आहेत, तर काही सुरक्षिततेसाठी आहेत. पण या दोन्हींचा फायदा तुम्ही एकाच योजनेत घेऊ शकता.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : LIC च्या काही योजना बचतीसाठी आहेत, तर काही सुरक्षिततेसाठी आहेत. पण या दोन्हींचा फायदा तुम्ही एकाच योजनेत घेऊ शकता. LICची न्यू जीवन आनंद पाॅलिसीत तुम्हाला बचत करायची संधी तर मिळतेच. पण तुम्हाला सुरक्षाही देते. या योजनेत तुम्हाला बोनसही मिळू शकतो. जाणून घेऊ या योजनेबद्दल-

काय आहे ही योजना? -  तुमचं वय 18 वर्षांचं असेल, तर LICची ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर असेल. या योजनेसाठी तुमचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त नको.

गुंतवायची रक्कम - या योजनेसाठी कमीत कमी 1 लाख रुपयांची विमा रक्कम घ्यावी लागते. जास्तीत जास्त कितीही घेऊ शकता.

पाॅलिसीचा काळ - न्यू जीवन आनंद प्लॅनची पाॅलिसी 15 ते 35 वर्षांपर्यंत आहे. LIC ची न्यू जीवन आनंद पाॅलिसी तुम्ही आॅनलाइनबरोबर आॅफलाइनही घेऊ शकता.

प्रीमियम - पाॅलिसीसाठी वर्ष, सहा महिने, तीन महिने आणि महिना असा प्रीमियम तुम्ही भरू शकता. याची खासीयत अशी की तीन वर्षानंतर तुम्ही पाॅलिसीवर कर्जही घेऊ शकता.

मॅच्युरिटीवर मिळेल फायदा - विमा राशीबरोबर साधा रिव्हर्सरी बोनस आणि अंतिम अॅडिशनल बोनस.

मॅच्युरिटीवर किती फायदा?

विमा राशी साधा रिव्हर्सरी बोनस अंतिम अॅडिशनल बोनस

5 लाख 5.04 लाख 10 हजार = 10.14 लाख

म्हणजे 21 वर्षांनी विमाधारक जिवंत असेल, तर त्याला 10 लाखापेक्षा जास्त पैसे मिळतील.

मॅच्युरिटीवर मृत्यू झाला - नाॅमिनीला विमा रक्कम 5 लाख रुपये मिळतील.

या पाॅलिसीच्या मध्ये मृत्यू झाला तर नाॅमिनीला विमा रक्कम मिळेल, ती विमा रकमेच्या 125 टक्के असेल. याबरोबर बोनस आणि अंतिम बोनसही मिळेल.

कर सवलत - 80C प्रमाणे या पाॅलिसीमुळे करात सूट मिळेल. मॅच्युरिटी किंवा मृत्यूनंतर मिळणाऱ्या पैशावरही कर बसणार नाही.

मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार का? असं का म्हणाल्या जयाप्रदा पाहा VIDEO

First published: April 15, 2019, 2:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या