LIC च्या या योजनेत मुलांसाठी वाचवा 206 रु., 27 लाख रुपये होतील जमा

LIC च्या या योजनेत मुलांसाठी वाचवा 206 रु., 27 लाख रुपये होतील जमा

मुलांच्या शिक्षणासाठी पालकांना मोठी बेगमी करावी लागते. यासाठीच LIC च्या योजनांचा चांगला उपयोग होऊ शकतो. LIC ची 'न्‍यू चि‍ल्‍ड्रंस मनी बैक प्‍लान' (New Children's Money Back Plan)ही योजना महत्त्वाची आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : मुलांच्या शिक्षणासाठी पालकांना मोठी बेगमी करावी लागते. यासाठीच LIC च्या योजनांचा चांगला उपयोग होऊ शकतो. LIC ची 'न्‍यू चि‍ल्‍ड्रंस मनी बैक प्‍लान' (New Children's Money Back Plan)ही योजना महत्त्वाची आहे. तुम्ही जर या योजनेत रोज 206 रुपयांची बचत केली तर 27 लाख रुपये जमा होऊ शकतात.

असे मिळतील 27 लाख रु.

जर तुमच्या मुलाचं वय 5 वर्ष आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी हा प्लॅन घेतलात तर 20 वर्षांनी जेव्हा तुमचा मुलगा 25 वर्षांचा होईल तेव्हा तुमची पॉलिसी मॅच्युअर होईल. जर तुम्ही 1 लाख 40 हजार रुपयांची सम अॅश्युअर्ड पॉलिसी घेतलीत तर तुम्हाला ही पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर 26 लाख 74 हजार रुपये मिळतील.

या पॉलिसीची खास वैशिष्ट्यं

1. ही विमा योजना घेण्यासाठी जास्तीत जास्त 12 वर्षांच्या वयोगटाची मुदत आहे.

2. कमीत कमी रक्कम 10 हजार रुपये आहे.

(हेही वाचा : मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना नव्या वर्षाची भेट, 10 हजार रुपयांपर्यंत वाढणार पगार)

3. जास्तीत जास्त विम्याच्या रकमेची कोणतीही मर्यादा नाही.

4.प्रिमियम वेव्हर बेनिफिट रायडरचा पर्याय उपलब्ध आहे.

(हेही वाचा : तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलंय का? आता उरले फक्त 2 दिवस!)

मॅच्युरिटी बेनिफिट

पॉलिसी मॅच्युअर होईल तेव्हा पॉलिसीधारकांना विम्याच्या रकमेमधला 40 टक्के बोनस मिळेल.

डेथ बेनिफिट

पॉलिसीच्या मुदतीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर विमा रकमेच्या व्यतिरिक्त आणखी बोनसही दिला जाणार आहे. डेथ बेनिफिटची एकूण रक्कम प्रिमियम पेमेंटच्या 105 टक्क्यांपेक्षा कमी नसेल.

=============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2019 04:18 PM IST

ताज्या बातम्या