Home /News /money /

LIC चा खास प्लॅन; फिक्स्ड इनकमसह मिळणार अनेक मोठे फायदे, जाणून घ्या या पॉलिसीबाबत

LIC चा खास प्लॅन; फिक्स्ड इनकमसह मिळणार अनेक मोठे फायदे, जाणून घ्या या पॉलिसीबाबत

या पॉलिसीमध्ये ग्राहकांना फिक्स्ड इनकमसह गॅरेंटी रिटर्नचीही सुविधा मिळणार आहे. हा एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग प्लॅन आहे. कंपनीने ट्वीट करत या पॉलिसीबाबत माहिती दिली आहे.

  नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : देशातील सरकारी विमा कंपनी एलआयसी (Life Insurance Policy) आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी नवी पॉलिसी घेऊन येते. LIC ने आता नवी बीमा ज्योती पॉलिसी (LIC Bima Jyoti) लाँच केली आहे. या पॉलिसीमध्ये ग्राहकांना फिक्स्ड इनकमसह गॅरेंटी रिटर्नचीही सुविधा मिळणार आहे. हा एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग प्लॅन आहे. कंपनीने ट्वीट करत या पॉलिसीबाबत माहिती दिली आहे. LIC ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर या पॉलिसीबाबत लिहिलं आहे. LIC of India launches new Plan - LIC's BIMA JYOTI - या प्लॅनमध्ये बेसिक सम एश्योर्ड एक लाख रुपयांचं आहे. याहून अधिकच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. ही पॉलिसी 15 ते 20 वर्षांसाठी घेता येऊ शकते. 15 वर्षाच्या पॉलिसी काळासाठी पीपीटी 10 वर्ष असेल आणि 16 वर्षाच्या पॉलिसीसाठी पीपीटी 11 वर्ष असेल.

  (वाचा - सोनं की FD? यंदा या गुंतवणुकीत मिळतोय सर्वाधिक परतावा)

  किती मिळेल गॅरेंटी रिटर्न - या पॉलिसीमध्ये टर्मदरम्यान प्रत्येक वर्षाच्या शेवटाला 50 रुपये प्रति हजार बेसिक सम एश्योर्डशिवाय गॅरेंटी देते. म्हणजेच यात 50 रुपये प्रति हजार सम एश्योर्डवर गॅरेंटी बोनस मिळेल. काय आहे पॉलिसीचं वैशिष्ट्य - >> ही पॉलिसी ऑनलाईन खरेदी करता येते >> यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष आहे >> तसंच मॅच्युरिटीवेळी कमाल वयोमर्यादा 75 वर्ष >> या पॉलिसीमध्ये प्रवेशासाठी किमान वय 90 दिवस आणि कमाल 60 वर्ष आहे >> पॉलिसी बॅक डेटिंग सुविधा >> ग्राहकांना मॅच्युरिटी सेटलमेंट पर्यायाची सुविधा मिळेल >> 5, 10 आणि 15 वर्षांच्या हप्त्यांमध्ये मॅच्युरिटी आणि डेथ बेनिफिट्सचा पर्याय >> अपघाती आणि अपंगत्व लाभ, गंभीर आजार, प्रीमियम लाभ आणि टर्म रायडरचा लाभ घेण्याचा पर्याय
  Published by:Karishma
  First published:

  Tags: LIC

  पुढील बातम्या