मुंबई, 19 मार्च: देशातील सर्वात मोठी सरकारी जीवन विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमने (Life Insurance Corporation) आपल्या कोट्यावधी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आता ग्राहक देशातील कोणत्याही एलआयसी शाखेत जाऊन एलआयसीच्या मॅच्युरिटी पॉलिसी (LIC policy maturity claim) पेमेंटसाठी कागदपत्रं सादर करू शकतात. महत्वाचं म्हणजे, मॅच्युरिटी क्लेमची (Maturity claim procedure lic) प्रक्रिया ही एलआयसीच्या मूळ शाखेतूनच (LIC main branch) केली जाईल, ही माहिती एलआयसीनं ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
LIC नं ट्विट करत सांगितलं की, पॉलिसीधारक महिन्याच्या अखेरीस देशभरात आपल्या नजीकच्या कोणत्याही एलआयसी ऑफिसमध्ये (LIC Office) जाऊन पॉलिसीच्या मॅच्युरिटीचा दावा करण्यासाठी कागदपत्रे सादर करु शकतात. एलआयसीच्या या घोषणेनंतर त्या पॉलिसीधारकांना मोठा दिलासा मिळेल ज्यांची पॉलिसी मॅच्युअर झाली आहे.
2 हजारांपेक्षा अधिक शाखा -
एलआयसीच्या देशभरामध्ये 113 विभागीय कार्यालये, 2,048 शाखा आणि 1,526 छोटी कार्यालये आहेत. या व्यतिरिक्त एलआयसीचे 74 कस्टमर झोन आहेत. जिथे पॉलिसीधारकांकडून त्यांच्या पॉलिसी मॅच्युरिटी क्लेमचे फॉर्म स्वीकारले जातील.
ना कागदपत्रांची गरज, ना बँकेत जाण्याची; घरबसल्याच उघडा बँक अकाऊंट
कोणत्याही शाखेतून घेतलेल्या पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर ग्राहक क्लेम फॉर्म कोणत्याही शाखेत जमा करू शकतील.
चाचणी प्रक्रियेनंतर अंमलात येईल सुविधा
एलआयसीचं असं म्हणणं आहे की, 'ही सुविधा सध्या चाचणी म्हणून सुरु करण्यात आली आहे आणि त्वरित अंमलात आली आहे. ही सुविधा 31 मार्चपर्यंत समाप्त होईल. एलआयसीमध्ये सध्या 29 कोटींपेक्षा जास्त पॉलिसीधारक आहेत. विमा व्यवसायात एलआयसी प्रथम क्रमांकावरील विश्वासार्ह कंपनी झाली आहे. लोकांना विश्वास आहे की, एलआयसीमध्ये गुंतवणूक केलेले पैसे कधीही बुडणार नाही.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LIC