Home /News /money /

LICच्या या योजनेत आहे कमी गुंतवणूक आणि चांगला रिटर्न! दररोज 160 रुपयांची बचत करून मिळवा 23 लाख

LICच्या या योजनेत आहे कमी गुंतवणूक आणि चांगला रिटर्न! दररोज 160 रुपयांची बचत करून मिळवा 23 लाख

LIC Money Back Plan: ही योजना 13 वर्षांपासून 50 वर्षापर्यंतची कोणतीही व्यक्ती खरेदी करू शकते. प्रत्येक 5 वर्षांनी तुम्हाला 15-20 टक्के पैसे तुम्हाला परत मिळतील

    मुंबई, 17 नोव्हेंबर: एलआयसी (Life Insurance Corporation of India- LIC) एक सरकारी विमा कंपनी आहे. एलआयसीकडून अनेक प्रकारचे विमा आणि गुंतवणुकीचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले जातात. जर तुम्हाला देखील कमी गुंतवणुकीतून चांगला रिटर्न मिळवायचा असेल तर एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. एलआयसीने एक प्लॅन लाँच केला आहे. या योजनेचं नाव एलआयसी न्यू मनी बॅक पॉलिसी (LIC New Money Back Policy) असून जाणून घ्या तुमच्यासाठी कशी फायद्याची आहे ही योजना या योजनेची खासियत अशी आहे की, पॉलिसीधारकाला दर 5 वर्षांनी काही ठराविक रक्कम 'मनी बॅक'च्या स्वरुपात मिळत असते. त्याचप्रमाणे मॅच्यूरिटीवेळी उत्तम रिटर्न आणि टॅक्श इन्शूरन्स बेनिफिट हे फायदे देखील मिळतात. एलआयसीचा हा मनी बॅक प्लॅन एक नॉन लिंक्ड लाइफ इन्शूरन्स पॉलिसी आहे. ज्यामध्ये एक गॅरंटिड रिटर्न आणि बोनस मिळतो. ही योजना घेण्यासाठी तुमच्याकडे 20 वर्ष आणि 25 वर्ष असे दोन पर्याय आहेत. ही पॉलिसी पूर्णपणे करमुक्त (Tax Free) पॉलिसी आहे. याशिवाय या पॉलिसीतील व्याज, प्रीमियम पेमेंट आणि मॅच्यूरिटीवेळी मिळणारी रक्कम यावरही टॅक्स लागणार नाही. मनीकंट्रोलच्या बातमीनुसार या प्लॅनमध्ये जर तुम्ही 25 वर्षांसाठी दररोज 160 रुपये गुंतवले तर 25 वर्षांनंतर तुम्हाला 23 लाख रुपये मिळतील. (हे वाचा-67 लाख पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! घरबसल्याच जमा करा जीवन प्रमाणपत्र) (हे वाचा-या बँकेची खास योजना! महिलांना बचत खात्यावर मिळेल 7 टक्क्यांपर्यंत व्याज) एलआयसीच्या माहितीनुसार ही योजना 13 ते 50 वयोगटातील कोणतीही व्यक्ती खरेदी करु शकते. पॉलिसीधारकाला प्रत्येक पाचव्या वर्षी अर्थात 5व्या, 10व्या, 15व्या, 20व्या वर्षी 15 ते 20 टक्के मनी बॅक मिळेल. मात्र हे तेव्हाच होईल जेव्हा प्रीमियम कमीत कमी 10 टक्के जमा झालेला असेल. त्याचप्रमाणे मॅच्यूरिटीवेळी ग्राहकांना बोनस देखील देण्यात येईल. एकूण 10 लाखाच्या या प्लॅनमध्ये अपघाती मृत्यूचा देखील लाभ मिळेल. 
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Insurance, Money

    पुढील बातम्या