Home /News /money /

LIC च्या खास योजना, जाणून घ्या कशाप्रकारे कराल फायदेशीर गुंतवणूक

LIC च्या खास योजना, जाणून घ्या कशाप्रकारे कराल फायदेशीर गुंतवणूक

जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर LIC च्या या योजनेबाबत तुम्ही विचार करू शकता. एलआयसीच्या या नव्या योजनांमध्ये कमी गुंतवणूक करून तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता

    मुंबई, 06 मार्च: जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर एलआयसीने (LIC) काही नवीन योजना आणल्या आहेत. तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता. LIC ची अशा योजनेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाल अधिक फायदा मिळू शकतो. LIC SIIP या योजनेमध्ये गुंतवणूक करणं अधिक फायद्याचं मानलं जात आहे. एलआयसीचे दोन नवे यूनिट-लिंक्ड प्लॅन- एलआयसी निवेश प्लस प्लॅन (UIN 512L317V01) आणि एलआयसी SIIP (UIN 512L334V01) प्लॅन आहेत. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा 90 दिवस तर जास्तीत जास्त 65 वर्षे आहे. एलआसी निवेश प्लस -एलआयसी निवेश प्लस सिंगल प्रीमियम, नॉन पार्टिसिपेटिंग, यूनिट-लिंक्ड आणि व्यक्तिगत जीवन विमा आहे, ज्यामध्ये पॉलिसी सुरु असताना विम्याबरोबरच गुंतवणुकीचा सुद्धा पर्याय मिळतो. -योजना घेणारा सिंगल प्रीमियम रक्कम निवडू शकतो. (हे वाचा-Gold and Silver Price : सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी, किमतीत पुन्हा मोठी घट) -पॉलिसी घेणारा किती पैसे जमा करणार आहे, हे ठरवू शकतो -पॉलिसी घेताना त्याच्याकडे बेसिक सम अॅश्युअर्ड निवडण्याची सुविधा देखील आहे.- या दोन्ही योजना ऑफलाइन तसेच ऑनलाइन खरेदी करू शकता. 02 मार्च 2020 पासून खरेदी करण्यासाठी ही योजना उपलब्ध आहे. एलआयसी SIIP -एलआयसी SIIP एक नियमित प्रीमियम, नॉन पार्टिसिपेटिंग, यूनिट-लिंक्ड आणि व्यक्तिगत जीवन विमा आहे, ज्यामध्ये पॉलिसी सुरु असताना विम्याबरोबरच गुंतवणुकीचा सुद्धा पर्याय मिळतो. -पॉलिसी घेणारे त्यांना भरायची प्रीमियम रक्कम निवडू शकतात. - किमान प्रीमियम 40,000 रुपये (वार्षिक) तर जास्तीत जास्त प्रीमियमसाठी मर्यादा नाही-पॉलिसी पूर्ण झाल्यावर युनिट फंडाच्या मूल्याइतकी रक्कम दिली जाईल. पॉलिसीची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीच्या अटींनुसार त्यातून काही पैसेही काढता येतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: LIC, Money

    पुढील बातम्या