LIC नं लाँच केली नवी पाॅलिसी, रोज 22 रुपये खर्च करून मिळतील हे 4 फायदे

LIC, Jeevan Amar Plan - एलआयसीनं एक नवा प्लॅन आणलाय. जाणून घ्या त्याबद्दल

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 04:19 PM IST

LIC नं लाँच केली नवी पाॅलिसी, रोज 22 रुपये खर्च करून मिळतील हे 4 फायदे

मुंबई, 06 ऑगस्ट : अनेकदा लोकांची तक्रार असते की LIC चे प्लॅन्स महागडे असतात. हे बदलण्यासाठी एलआयसीनं स्वस्त, पारंपरिक आणि पूर्ण सुरक्षा असलेली विमा योजना जीवन अमर लाँच केलीय. LIC नं सांगितल्याप्रमाणे जीवन अमर प्लॅनमध्ये दोन डेथ बेनेफिट्स ऑप्शन्स, जसं सम अॅश्योर्ड आणि वाढीव सम अॅश्योर्ड यापैकी एक सुविधा मिळते.

LIC चा हा प्लॅन अमूल्य जीवनहून स्वस्त आहे. एलआयसीनं अमूल्य जीवन टर्म प्लॅनला परत घेतलंय. जाणून घेऊ LICच्या जीवन अमर प्लॅनबद्दल-

अमेरिकेनं चीनच्या विरोधात घेतला 29 वर्षातला मोठा निर्णय

1. 10 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत पाॅलिसी टर्म

LIC चा जीवन अमर प्लॅन 18 ते 65 वर्षांच्या व्यक्ती घेऊ शकताच. जास्तीत जास्त मॅच्युरिटी वय 80 वर्ष आहे. जीवन अमरची पाॅलिसी टर्म 10 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असेल.

Loading...

लागोपाठ 6व्या दिवशी पेट्रोलच्या दरात घट, जाणून घ्या तुमच्या शहरातले भाव

2. प्रीमियम भरण्यासाठी मिळतील पर्याय

एलआयसी जीवन अमर प्लॅनच्या प्रीमियमचे तीन पर्याय मिळतील. सिंगल, रेग्युलर आणि लिमिटेड प्रीमियम. लिमिटेड प्रीमियममध्ये दोन पर्याय येतात. प्रीमियम पेइंग टर्म ( PPT ), 5वर्षांहून कमी असलेली पाॅलिसी टर्म आणि 10 वर्षाहून कमी असलेली दुसरी पाॅलिसी टर्म. प्रीमियम भरण्याचं जास्तीत जास्त वय 70 वर्ष आहे. रेग्युलर आणि लिमिटेड प्रीमियम पर्यायात कमीत कमी प्रीमियम 3 हजार रुपये आहे. सिंगल प्रीमियम पर्यायात कमीत कमी प्रीमियम 30 हजार रुपये आहे.

SBI नं ग्राहकांना केलं सावध, तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी 'हे' करायलाच हवं

3. महिलांना करावा लागणार कमी खर्च

रेग्युलर प्रीमियम पर्यायात कुठलीही सरेंडर व्हॅल्यू मिळणार नाही. तो सिंगल प्रीमियममध्ये उपलब्ध होईल. लिमिटेड प्रीमियम पर्यायात काही नियम आणि अटी आहेत. पुरुष आणि महिलांच्या प्रीमियम रकमा वेगवेगळ्या आहेत.

4. धूम्रपान न करणाऱ्यांना कमी प्रीमियम

सिगरेट ओढणारा आणि न ओढणारा यांच्या प्रीमियममध्ये फरक असेल. पुरुषांचा प्रीमियम महिलांपेक्षा जास्त असेल. तसाच सिगरेट ओढणाऱ्यांचा प्रीमियम जास्त असेल.

LIVE VIDEO पाण्यात गाडी घालण्याचं धाडस पडलं महागात; कारसह नदीत वाहून गेला तरुण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: LIC
First Published: Aug 6, 2019 04:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...