महिन्याला 518 रुपये भरून घ्या LIC ची पॉलिसी, 4 लाखांपेक्षा जास्त रकमेचा लाभ

महिन्याला 518 रुपये भरून घ्या LIC ची पॉलिसी, 4 लाखांपेक्षा जास्त रकमेचा लाभ

ही योजना एक अशी खास योजना आहे ज्यात मर्यादित काळासाठी प्रिमियम भरावा लागतो. ही योजना शेअर मार्केटवर आधारित नाही. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने ती सुरक्षित आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : भारतातली सगळ्यात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC ने आपल्या ग्राहकांसाठी काही खास प्लॅन आणले आहेत. यात गुंतवणूक करणं फायद्याचं आहे.

LIC ची जीवनलाभ योजना

ही योजना एक अशी खास योजना आहे ज्यात मर्यादित काळासाठी प्रिमियम भरावा लागतो. ही योजना शेअर मार्केटवर आधारित नाही. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने ती सुरक्षित आहे.

518 रुपये खर्च करा आणि 4.04 लाख रुपये मिळवा

LIC ची ही योजना 8 ते 59 वर्ष वयोगटाच्या लोकांसाठी आहे. यामध्ये मॅच्युरिटीसाठी 75 वर्ष वयाची अट आहे. 16 ते 25 वर्षांपर्यंत पॉलिसी टर्म घेऊ शकता.

(हेही वाचा : बँकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारचा प्लॅन, तुम्हालाही होणार थेट लाभ)

यामध्ये कमीतकमी 2 लाख रुपये आणि जास्तीत जास्त कितीही रुपये गुंतवू शकता. या योजनेत अपघाती निधन आणि अपंगत्वासाठी मिळणाऱ्या नुकसान भरपाईचा समावेश आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर तुम्ही 25 वर्षांपर्यंत 1 लाख 55 हजार 328 रुपयांचा प्रिमियम भरलात तर तुम्हाला बोनससह सुमारे 4. 04 लाख रुपये मिळतील. यासाठी महिन्याला 518 रुपये खर्च करावे लागतील.

(हेही वाचा : रोज 22 रुपये गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा 8 हजार रुपये, मोदी सरकारच्या 2 योजना)

या पॉलिसीची वैशिष्ट्यं

या पॉलिसीमध्ये प्रिमियम भरण्याचा कालावधी मॅच्युरिटीच्या कालावधीपेक्षा कमी असेल.ही पॉलिसी घ्यायची असेल तर 16, 21 आणि 25 वर्षांच्या कालावधीचे पर्याय आहेत. 3 वर्षं हप्ता भरला तर या योजनेवर कर्जही मिळू शकतं. तुम्ही जो हप्ता भराल त्यावर कलम 80C नुसार करात सूट मिळेल.

=====================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: LICmoney
First Published: Nov 29, 2019 04:40 PM IST

ताज्या बातम्या