मराठी बातम्या /बातम्या /मनी /मुलांच्या शिक्षणखर्चाची तरतूद करण्यासाठी LIC ची ‘ही’ योजना उत्तम

मुलांच्या शिक्षणखर्चाची तरतूद करण्यासाठी LIC ची ‘ही’ योजना उत्तम

ही पॉलिसी 90 दिवसांपासून ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलासाठी घेता येते. 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलासाठी हे पॉलिसी घेता येत नाही.

ही पॉलिसी 90 दिवसांपासून ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलासाठी घेता येते. 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलासाठी हे पॉलिसी घेता येत नाही.

ही पॉलिसी 90 दिवसांपासून ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलासाठी घेता येते. 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलासाठी हे पॉलिसी घेता येत नाही.

  नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : आजकाल मुलांच्या शिक्षणाचा खर्चही (Education Expenditure) प्रचंड वाढला आहे. शाळा-कॉलेजची फी, वह्या पुस्तकांचा खर्च, उच्च शिक्षणासाठी नामांकित संस्थांमध्ये जायचे असल्यास त्याचा खर्च, परदेशी शिक्षण घ्यायचे असल्यास त्यासाठीचा खर्च हा प्रचंड असतो. यामुळे अनेकदा हुशार मुलांचीही उत्तम शिक्षणाची संधी हुकते. त्यांची स्वप्ने अपूर्ण राहतात. पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा साठवत असतात; पण अनेकदा ती पुंजी खूप कमी असते. मग शैक्षणिक कर्ज घेण्याची वेळ येते. हे सगळे टाळण्यासाठी एलआयसीने (LIC) एक अत्यंत उत्तम योजना दाखल केली आहे. जीवन तरुण (Jeevan Tarun) असे या पॉलिसीचे नाव आहे.

  टीव्ही9 हिंदी डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, मुलांच्या उच्च शिक्षणाच्या खर्चाची (Higher Education Fund) तरतूद करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही पॉलिसी आणण्यात आली आहे. यामध्ये, मॅच्युरिटीचे पैसे मुदतीनंतर एकरकमी घेण्याची किंवा मनी बॅकच्या (Money Back) स्वरूपात घेण्याचीही सुविधा आहे. पॉलिसी घेणाऱ्या पालकांचा मुलगा किंवा मुलगी 20 वर्षांची होते तेव्हा मनी बॅकच्या रूपाने ठराविक रक्कम दिली जाते. 24 व्या वर्षांपर्यंत ही रक्कम दिली जाते. त्यानंतर पॉलिसीची मुदत संपल्यानंतर उर्वरीत सर्व रक्कम दिली जाते. या पॉलिसीत वेस्टेड सिंपल रिव्हिजनरी बोनस आणि फायनल अॅडिशनल बोनस, असे दोन प्रकारचे बोनस दिले जातात.

  ही पॉलिसी 90 दिवसांपासून ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलासाठी घेता येते. 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलासाठी हे पॉलिसी घेता येत नाही. मुलाचे वय 25 वर्षे होईपर्यंत या पॉलिसीची मुदत असते. म्हणजे मुलाच्या 12 व्यावर्षी ही पॉलिसी घेतली तर 13 वर्षे मुदत असेल. मूल 3 वर्षांचे असताना पॉलिसी घेतली तर मुदत 22 वर्षे असेल. ही मर्यादित पेमेंट टर्म योजना (Limited Payment Term Scheme) असल्यानं पॉलिसीच्या एकूण मुदतीपेक्षा 5 वर्ष कमी मुदतीपर्यंत प्रीमियम भरावा लागेल. मूल 25 वर्षांचे झाल्यावर या पॉलिसीची मुदत पूर्ण होईल आणि त्यावेळी जमा असलेली रक्कम दिली जाईल. या पॉलिसीमध्ये किमान 70,000 रुपयांची विमा रक्कम घेणे आवश्यक आहे. कमाल विमा रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. मूल 8 ते 12 वर्षांचे झाल्यावर रिस्क कव्हर (Risk Cover) सुरू होते. पॉलिसी घेताना मुलाचे वय 8 वर्षांपेक्षा कमी असेल तर 8 वर्षे पूर्ण झाल्यावर रिस्क कव्हर सुरू होईल किंवा पॉलिसी घेतल्यानंतर 2 वर्षानंतर रिस्क कव्हर सुरू होईल.

  खूशखबर! ESIC अंतर्गत येणार 30000 रुपयांपर्यंत पगार मिळवणारे कर्मचारी? वाचा काय आहे योजना

  ही पॉलिसी समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ. समजा, 35 वर्षीय रोहित नामक व्यक्तीने आपला मुलगा आकाश 2 वर्षांचा असताना 5 लाखांच्या विमा रकमेची जीवन तरुण पॉलिसी घेतली. मुलाचे वय 2 वर्षे असल्याने, पॉलिसीची मुदत (Policy Term) 23 वर्षे असेल. रोहितला पॉलिसी मुदतीपेक्षा 5 वर्षे कमी म्हणजेच 18 वर्षांपर्यंत प्रीमियम (Premium) भरावा लागेल. रोहितने मनी बॅक (Money Back) पर्याय निवडला आहे, त्यामुळे दरवर्षी विमा रकमेच्या 10 टक्के पैसे त्याला परत मिळतील.

  रोहितने मासिक प्रीमियम योजना घेतली, तर त्याला दरमहा 2160 रुपये भरावे लागतील. म्हणजेच दररोज 70 रुपये बचत करून तो हा प्रीमियम भरू शकेल. वार्षिक प्रीमियमचा पर्याय निवडल्यास त्याला वर्षाला 25 हजार 351 रुपये भरावे लागतील. 18 वर्षे मुदतीत त्याला 4 लाख 56 हजार 876 रुपये भरावे लागतील. आकाश 20 वर्षांचा होईल, तेव्हा त्याला मनी बॅकद्वारे दरवर्षी 50 हजार रुपये मिळतील. हे पैसे त्याला 24 व्या वर्षांपर्यंत म्हणजे 5 वर्षे मिळतील. आकाश 25 वर्षांचा होईल, तेव्हा पॉलिसी परिपक्व (Mature) होईल आणि त्याला त्याचे पैसे मिळतील. मनी बॅकद्वारे त्याला विमा रकमेच्या 50 टक्के पैसे मिळाले आहेत. त्यामुळे विमा रकमेची 50 टक्के रक्कम म्हणजे 2 लाख 50 हजार अधिक 5 लाख 52 हजार रुपये वेस्टेड सिंपल रिव्हिजनरी बोनस म्हणून आणि फायनल अॅडिशनल बोनस 1 लाख 25 हजार रुपये असे एकूण 9 लाख 27 हजार रुपये आकाशला मिळतील.

  Bank Holidays: महिनाअखेरपर्यंत 4 दिवस बंद राहणार बँका, सुट्ट्यांची यादी तपासून पूर्ण करा कामं

  या पॉलिसीमध्ये पेड-अप व्हॅल्यूचा नियम (Paid Up Value Rule) अत्यंत महत्त्वाचा आहे. पॉलिसीधारकाने दोन वर्षांसाठी प्रीमियम भरला आणि त्यानंतर पॉलिसी बंद केली, तर विमा रकमेत कपात करून ती रक्कम पॉलिसीधारकाला दिली जाते. तसंच या पॉलिसीला करसवलतीचा (Tax Benefit) लाभदेखील मिळतो. पॉलिसीधारकाने प्रीमियम म्हणून भरलेली रक्कम प्राप्तिकर कायदा (Income Tax Act) कलम 80 सी (80 C) अंतर्गत करमुक्त आहे. मॅच्युरिटीनंतर मिळणारे पैसे किंवा पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास मिळणारी रक्कम प्राप्तिकर कायदा कलम 10 (10 डी) अंतर्गत पूर्णपणे करमुक्त आहे.

  First published:
  top videos

   Tags: LIC