मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुमच्या म्हतारपणाची आताच करा सोय, LIC ची ही योजना देतेय उत्तम रिटर्न

तुमच्या म्हतारपणाची आताच करा सोय, LIC ची ही योजना देतेय उत्तम रिटर्न

एलआयसीच्या अनेक प्रकारच्या पॉलिसी उपलब्ध आहेत. त्यापैकी एलआयसी जीवन शांती ही विशेष एलआयसी पॉलिसी आहे.

एलआयसीच्या अनेक प्रकारच्या पॉलिसी उपलब्ध आहेत. त्यापैकी एलआयसी जीवन शांती ही विशेष एलआयसी पॉलिसी आहे.

एलआयसीच्या अनेक प्रकारच्या पॉलिसी उपलब्ध आहेत. त्यापैकी एलआयसी जीवन शांती ही विशेष एलआयसी पॉलिसी आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : अनेक जण भविष्य सुरक्षित करण्यासाठी एलआयसी पॉलिसी घेतात. एका ठराविक कालावधीनंतर त्याचा आपल्याला फायदा व्हावा किंवा आपल्याला काही झाल्यास नॉमिनीला आर्थिक मदत मिळावी म्हणून पॉलिसी काढली जाते. एलआयसीच्या अनेक प्रकारच्या पॉलिसी उपलब्ध आहेत. त्यापैकी एलआयसी जीवन शांती ही विशेष एलआयसी पॉलिसी आहे.

ती विमाधारक व्यक्तीला लाइफटाइम पेन्शन देते. या योजनेतील खास गोष्ट म्हणजे ती एकरकमी पैसे गुंतवून लाइफटाइम पेन्शन देते. ही सिंगल प्रीमिअम, विनाभागीदारी, वार्षिक योजना आहे, ज्यामध्ये विमाधारकाला दुहेरी लाभ मिळतो. भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) ही योजना ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने खरेदी करता येते.

भारतीय जीवन विमा महामंडळ LIC जीवन शांती योजना तुम्हाला डिफर्ड अॅन्युइटी ऑप्शन आणि तात्काळ अॅन्युइटी ऑप्शन ऑफर करते. पहिल्या पर्यायामध्ये, तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी पेन्शन योजना खरेदी करू शकता. डिफर्ड अॅन्युइटी फॉर सिंगल लाइफमध्ये एखाद्या पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या अकाउंटमधील पैसे त्याच्या नॉमिनीला मिळतील.

मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवायचंय? कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

तसंच जर पॉलिसीधारक जिवंत असेल तर ठराविक कालावधीनंतर त्याला पेन्शन मिळू लागते. डिफर्ड अॅन्युइटी फॉर जॉइंट लाइफमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, दुसऱ्याला पेन्शन मिळत राहते आणि जर दोघेही मरण पावले, तर पॉलिसीचे शिल्लक राहिलेले पैसे नॉमिनीला दिले जातात.

एलआयसी जीवन शांती योजनेत अशी करा गुंतवणूक

LIC जीवन शांती योजना खरेदी करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धती वापरू शकता. तसंच जे गुंतवणूकदार या सिंगल-प्रीमिअम, अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत ते ही पॉलिसी खरेदी करू शकतात.

ही पॉलिसी एलआयसी एजंटच्या माध्यमातून किंवा जवळच्या एलआयसी कार्यालयातून ऑफलाइन खरेदी करता येते. तसंच तुम्ही एलआयसीच्या www.licindia.in. या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन खरेदी करू शकता.

पॉलिसी खरेदी करण्यासाठी पात्रता

LIC जीवन शांती योजना खरेदी करण्यासाठी तुमचं वय 30 ते 79 वर्षांच्या दरम्यान असावं. तुम्ही पॉलिसी एका वर्षापासून ते 12 वर्षांपर्यंतच्या डेफरमेंट पीरियडसाठी घेऊ शकता. तुम्हाला 31 ते 80 वर्षांदरम्यान पेन्शन किंवा अॅन्युइटीचा फायदा होईल. त्याची खास गोष्ट म्हणजे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला डेथ बेनिफिट मिळतो.

लग्नासाठी दागिने खरेदी करायला लोनची गरज आहे? कसं घेता येतं लोन

तुम्ही एलआयसी जीवन शांती योजनेवर कर्जही घेऊ शकता आणि जर तुम्हाला ही पॉलिसी सरेंडर करायची असेल, तर करू शकता. तुम्हाला तो पर्यायही या योजनेत उपलब्ध आहे.

First published:

Tags: LIC