Home /News /money /

LIC ची जबरदस्त योजना! एकदाच हप्ता भरून दर महिन्याला मिळवा 19000, आयुष्यभर होईल कमाई

LIC ची जबरदस्त योजना! एकदाच हप्ता भरून दर महिन्याला मिळवा 19000, आयुष्यभर होईल कमाई

LIC च्या 'जीवन अक्षय' (Jeevan Akshay) पॉलिसीमध्ये तुम्ही एकदाच पैसे गुंतवून आयुष्यभर कमाई करू शकता.

    नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : एलआयसी (LIC) ग्राहकांच्या सुरक्षेसाठी नवनवे प्लॅन्स लाँच करत असते. कंपनीने नुकताच एक खास प्लॅन सुरू केला आहे. या योजनअंतर्गत तुम्ही एकदाच पैसे गुंतवून आयुष्यभर कमाई करू शकता. या योजनेचे नाव 'जीवन अक्षय' (Jeevan Akshay) आहे. ज्या लोकांना वृद्धापकाळात पेन्शनची चिंता आहे, त्यांच्यासाठी ही योजना बेस्ट आहे. हा प्लॅन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने खरेदी केला जाऊ शकतो. काय आहे LIC ची ही योजना? LIC ची या पॉलिसीची योजना जीवन अक्षय-7 (प्लॅन नंबर 857) आहे. ही सिंगल प्रीमियम वाली नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल अ‍ॅन्यूटी योजना आहे. ही पॉलिसी 25 ऑगस्ट  2020 पासून सुरू झाली आहे. कोण खरेदी करू शकतो ही योजना? ही योजना 30 ते 85 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती खरेदी करू शकते. दिव्यांगजनांना फायदा मिळवण्यासाठी देखील ही योजना खरेदी केली जाऊ शकते. पॉलिसी जारी झाल्यानंतर तीन महिन्यांनी लोन सुविधा देखील मिळते. अर्थात या कालावधीनंतर पॉलिसीधारक कर्ज घेऊ शकतात. (हे वाचा-करदात्यांसाठी आनंदाची बातमी! ITR भरण्याची डेडलाइन वाढवली, आता ही असणार तारीख) कमीतकमी 12 हजार Annuity ही पॉलिसी तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहा महिन्यांसाठी किंवा एका वर्षाच्या अ‍ॅन्यूटी मोडमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये ग्राहकांना कमीतकमी 12 हजार अ‍ॅन्यूटी मिळू शकते. LIC च्या या पॉलिसीची खासियत अशी आहे की, गुंतवणूक करताना पॉलिसीधारक पेन्शनसाठी 10 वेगवेगळे पर्याय निवडू शकतो. आवश्यकतेनुसार हे पर्याय निवडता येतील. यापैकी एक 'Annuity Payable for life at a uniform rate' (दरमहा पेन्शन पर्याय A) हा देखील आहे. कसे मिळतील महिना 19 हजार? या पॉलिसीमध्ये तुम्ही कमीतकमी 1,00,000 रुपये गुंतवू शकता. तर जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणती मर्यादा नाही आहे. जर तुम्ही या पॉलिसीमध्ये एकरकमी 4072000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल तेव्हा तुमच्या खात्यात 19 हजार रुपये महिना पेन्शन येईल. वाचा उदाहरणार्थ- वय- 32 वर्षे सम अश्योर्ड- 4000000 एकरकमी प्रीमियम- 4072000 (हे वाचा-घरखरेदी होईल स्वस्त! केवळ 3.99 टक्के व्याजदराने ही कंपनी देत आहे गृहकर्ज) पेन्शन- वार्षिक- 234800 अर्धवार्षिक-115600 तिमाही-57350 मासिक- 19000 उदाहरणार्थ देण्यात आलेली व्यक्ती 32 व्या वर्षी या पॉलिसीतील A पर्याय आणि 4000000 रुपयांच्या सम अश्योर्ड निवडते. तर त्या व्यक्तीला 4072000 रुपये एकरकमी प्रीमियम भरावा लागेल. यानंतर मासिक 19000 रुपये पेन्शन मिळेल. मृत्यूनंतर ही पेन्शन मिळणे बंद होईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money, Personal finance

    पुढील बातम्या