मराठी बातम्या /बातम्या /मनी /LIC ‘या’ योजनेत गुंतवणूक करा आणि महिन्याला मिळवा 20 हजार रुपये पेन्शन

LIC ‘या’ योजनेत गुंतवणूक करा आणि महिन्याला मिळवा 20 हजार रुपये पेन्शन

महिन्याला पेन्शन मिळवण्यासाठी काय करायचं? ही योजना सर्वात भारी

महिन्याला पेन्शन मिळवण्यासाठी काय करायचं? ही योजना सर्वात भारी

महिन्याला पेन्शन मिळवण्यासाठी काय करायचं? ही योजना सर्वात भारी

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई: एलआयसी ही भारतातील सर्वांत मोठी विमा कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक योजना आहेत. कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वजण लाभ घेऊ शकतील, अशा योजना एलआयसी आणत असते.

    या योजनेच्या माध्यमातून लोकांना गुंतवणूक करता येते, तसंच त्यांचं भविष्य सुरक्षित करता येतं. आपल्या ग्राहकांच्या भविष्याची काळजी लक्षात घेत एलआयची नवनवीन योजना आणते. त्यापैकी एक योजना जीवन अक्षय पॉलिसी आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला पेन्शन मिळू शकते.

    तुम्ही LIC च्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून दरमहा चांगलं उत्पन्न मिळवू शकता. या साठी, तुम्हाला दीर्घकाळासाठी फक्त एकदाच पैसे गुंतवावे लागतील. यानंतर तुम्हाला दरमहा 20 हजार रुपये पेन्शन मिळेल.

    भारतातील विम्याच्या बाबतीत एलआयसी ही बाजारपेठेतील प्रमुख कंपनी आहे. सरकारी मालकीच्या कंपनीचा बाजारातील हिस्सा इतर सर्व कंपन्यांच्या एकत्रित हिश्श्यापेक्षा जास्त आहे. या संदर्भात ‘टीव्ही 9 हिंदी’ने वृत्त दिलंय.

    एलआयसीच्या पॉलिसी केवळ विमा कव्हर देत नाहीत तर त्या चांगले रिटर्न्सही देतात. LIC ची जीवन अक्षय ही अशाच पॉलिसींपैकी एक आहे. ही सर्वात चांगल्या एलआयसी पॉलिसींपैकी एक आहे. यामध्ये एकरकमी पैसे भरून तुम्ही दरमहा 20,000 रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकता. LIC जीवन अक्षय कंपनीकडे जमा केलेल्या एकरकमी पैशांच्या बदल्यात महिन्याला पेन्शन देते.

    इन्शुरन्स खरेदी करणाऱ्या नवीन ग्राहकांना मिळणार इन्सेंटिव्ह, 2023 च्या बजेटकडून 'या' आहेत अपेक्षा

    महिन्याला पेन्शन मिळवण्यासाठी काय करायचं

    ही पॉलिसी घेणार्‍या व्यक्तीचे वय 75 वर्षे असेल तर तिला 40 लाख 72 हजार रुपये प्रीमियम गुंतवावा लागेल.

    त्यानंतर त्याला दरमहा 20 हजार रुपये पेन्शन दिली जाईल.

    6 लाख 10 हजार 800 रुपयांचा प्रीमियम भरल्यास, या प्लॅनवर 6 लाख रुपयांची रक्कम मिळेल.

    अशा परिस्थितीत तुम्हाला वर्षभरासाठी 76 हजार 650 रुपये पेन्शन दिली जाईल.

    ही पेन्शन दरमहा घ्यायची असेल तर 6 हजार रुपये मिळतील.

    सहामाही पेन्शन घेतल्यास तुम्हाला 37 हजार रुपये मिळतील.

    क्रेडिट कार्डला बनवा तुमचं प्रॉफिट कार्ड! हे फायदे तुम्हाला माहितीय का?

    एलआयसीच्या जीवन अक्षय योजनेत वर्षभरासाठी किमान 12 हजार पेन्शन मिळत असते.

    ही पेन्शन गुंतवणूकदाराला मृत्यूपर्यंत मिळत असते.

    या योजनेच्या इतर फायद्यांमध्ये कर्ज घेण्याची सुविधादेखील समाविष्ट आहे.

    पॉलिसी धारक पॉलिसी खरेदी केल्यानंतर 90 दिवसांनंतर त्यावर कर्ज मिळवू शकतो.

    या योजनेत किमान गुंतवणूक 1 लाख रुपये करावी लागते.

    First published:

    Tags: Pension, Pension funds, Pension scheme, Pensioners