Home /News /money /

उद्याच्या लिस्टिंगआधी LIC IPOची ग्रे मार्केटमधील किंमत काय? गुंतवणूकदारांना नफा होणार की नुकसान? चेक करा डिटेल्स

उद्याच्या लिस्टिंगआधी LIC IPOची ग्रे मार्केटमधील किंमत काय? गुंतवणूकदारांना नफा होणार की नुकसान? चेक करा डिटेल्स

LIC IPO 4 मे रोजी सामान्य गुंतवणूकदारांच्या सबस्क्रिप्शनसाठी खुला होता आणि तो 9 मे रोजी बंद झाला. 12 मे रोजी बोलीदारांना शेअर्सचे वाटप करण्यात आले. 6 दिवसांसाठी बोलीसाठी खुला, एलआयसी आयपीओ इश्यू तिप्पट सबस्क्राईब झाला.

    मुंबई, 16 मे : गेल्या काही महिन्यांपासून ज्याची प्रतीक्षा होती तो क्षण काही तासांवर आला आहे. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा म्हणजेच LIC IPO उद्या शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. दरम्यान गुंतवणुकदारांचं लक्ष आपल्याला शेअर्स मिळाले की नाही याकडे आहे. याशिवाय अनेकांना या IPO मधून चांगल्या लिस्टिंग गेनची आशा आहे. कारण LIC IPO ला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या आठवड्यात ग्रे-मार्केटमध्ये प्रीमियम (LIC IPO GMP) घसरत राहिल्याने, कदाचित डिस्काऊंटसह स्टॉक लिस्ट होणार नाही ना अशी भीती सर्वांना आहे. लाइव्ह मिंटने बाजार तज्ञांच्या आधारावर सांगितले की, ग्रे-मार्केटमध्ये एलआयसीचा शेअर 19 रुपयांच्या सवलतीवर व्यवहार करत आहे. याचा अर्थ असा आहे की ते शेअर डिस्काऊंटवर लिस्ट केला जाऊ शकतो. म्हणजे एलआयसीच्या शेअरची (LIC Share Price) किंमत 949 रुपये निश्चित करण्यात आली आहे आणि जर 19 रुपये प्रति शेअर डिस्काऊंडने शेअर 930 रुपयांवर लिस्ट होऊ शकतो. तरुणांनी करिअरच्या सुरुवातीलाच घर घरेदी करावं का? काय होईल फायदा? तज्ज्ञांचं मत जाणून घ्या अनलिस्टेड एरिनाचे संस्थापक अभय दोशी यांचा हवाला देत लाईव्ह मिंटने लिहिले की, आकर्षक मूल्य असूनही, सध्या बाजारातील कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे LIC IPO संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. जर आपण सध्याची स्थिती पाहिली तर कदाचित LIC चे शेअर डिस्काऊंटसह लिस्ट होऊ शकतात. पण जर बाजार लिस्टिंगपूर्वी स्थिर झाला आणि सुधारणा झाली तर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. म्हणून, जोपर्यंत लिस्टिंग गेनचा संबंध आहे, गुंतवणूकदारांनी त्यांना मर्यादित केले पाहिजे. SBI च्या ग्राहकांना महिनाभरात दुसरा झटका; कर्जाचा EMI आणखी वाढणार, काय आहे कारण? पॉलिसीधारकांना अतिशय स्वस्तात शेअर्स मिळाले लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा IPO 4 मे रोजी सामान्य गुंतवणूकदारांच्या सबस्क्रिप्शनसाठी खुला होता आणि तो 9 मे रोजी बंद झाला. 12 मे रोजी बोलीदारांना शेअर्सचे वाटप करण्यात आले. 6 दिवसांसाठी बोलीसाठी खुला, एलआयसी आयपीओ इश्यू तिप्पट सबस्क्राईब झाला. एलआयसी किरकोळ गुंतवणूकदार आणि एलआयसी कर्मचार्‍यांना प्रति शेअर 45 रुपये सूट देण्यात आली. त्याचबरोबर पॉलिसीधारकांना यामध्ये प्रति शेअर 60 रुपये सूट देण्यात आली होती. किरकोळ गुंतवणूकदार आणि LIC कर्मचाऱ्यांना एक शेअर 904 रुपयांना मिळाला, तर पॉलिसीधारकांना प्रति शेअर 889 रुपये मोजावे लागले.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: LIC, Money, Share market

    पुढील बातम्या