मराठी बातम्या /बातम्या /मनी /

LIC बाबत मोदी सरकार घेणार मोठा निर्णय; मेगा IPO संदर्भात हालचाली वाढल्या

LIC बाबत मोदी सरकार घेणार मोठा निर्णय; मेगा IPO संदर्भात हालचाली वाढल्या

देशातली सर्वांत मोठी विमा कंपनी LIC च्या समभागांच्या विक्रीवरून केंद्र सरकारला विरोधी पक्षांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे.

देशातली सर्वांत मोठी विमा कंपनी LIC च्या समभागांच्या विक्रीवरून केंद्र सरकारला विरोधी पक्षांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे.

देशातली सर्वांत मोठी विमा कंपनी LIC च्या समभागांच्या विक्रीवरून केंद्र सरकारला विरोधी पक्षांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे.

नवी दिल्ली, 4 जून : भारतीय जीवन विमा निगम (Life Insurance Corporation) अर्थात एलआयसीचा मेगा आयपीओ (Mega IPO) प्रस्तावित आहे. त्या संदर्भातल्या हालचाली वाढल्या आहेत. केंद्र सरकार त्यासाठी जून महिन्यातच इन्व्हेस्टमेंट बँकर्सकडून (Investment Bankers) प्रस्ताव मागवण्याची शक्यता आहे. या प्रस्तावांच्या आधारे एलआयसीच्या आयपीओच्या (LIC IPO) संचालनासाठी इन्व्हेस्टमेंट बँकर्सची नियुक्ती केली जाणार आहे.

ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने  दिलेल्या वृत्तानुसार, याच महिन्यात केंद्र सरकार इन्व्हेस्टमेंट बँकर्सकडून प्रस्ताव मागवू शकतं. तसंच, येत्या काही आठवड्यांत एलआयसीच्या शेअर्सच्या (Shares) विक्रीसाठी सरकार आमंत्रण पाठवू शकतं, असंही त्या वृत्तात म्हटलं आहे.

त्याचप्रमाणे, मार्च 2022पर्यंत एलआयसीचा आयपीओ येऊ शकतो, अशी शक्यताही त्यात वर्तवण्यात आली आहे. एलआयसीच्या समभागांच्या विक्रीवरून केंद्र सरकारला विरोधी पक्षांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaharaman) यांनी 2020-21चं बजेट सादर करतानाच एलआयसीच्या आयपीओची घोषणा केली होती. एलआयसीसह एअर इंडिया (Air India) आणि बीपीसीएल (BPCL) या कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीच्या (Disinvestment) दृष्टीनेही केंद्र सरकार पुढची पावलं उचलणार असल्याची अपेक्षा आहे.

या कंपनीच्या शेअर्सनी दिले आठवड्याभरात 100 टक्के रिटर्न्स; फक्त 50 रुपये किंमत

महत्त्वाकांक्षी निर्गुंतवणूक योजनेद्वारे 24 अब्ज डॉलरचा निधी उभा करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. या निधीमुळे कोरोना काळात खर्च वाढलेल्या सरकारला आर्थिक बळ मिळण्यास मदत होणार आहे.

एलआयसीच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, 2019-20मध्ये एलआयसीची एकूण अनुमानित संपत्ती 32 लाख कोटी रुपये अर्थात 439 अब्ज डॉलर एवढी आहे. भारतीय बाजारपेठेतला एलआयसीचा हिस्सा जवळपास 70 टक्के आहे.

RBI ची मोठी घोषणा: Bank Holiday असेल तरी तुमचा पगार, पेन्शन नाही खोळंबणार

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (Life Insurance Corporation) अर्थात LIC आपल्या ग्राहकांचं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित राखण्यासाठी कायमच विशेष योजना सादर करत राहतं. एलआयसीच्या योजना वेगवेगळ्या वर्गांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या असतात. जीवन शांती (Jeevan Shanti) या योजनेद्वारे दर महिन्याला पेन्शन मिळण्याचा पर्याय असतो. त्यामुळे काही कारणामुळे हातात अचानक मोठी रक्कम आली असेल, तर ती एकरकमी या योजनेत गुंतवून नंतर दर महिन्याला पेन्शन स्वरूपात पैसे मिळवता येतात. एलआयसीच्या कोणत्याही पॉलिसीचा कालावधी सुरू असताना पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला आणि त्याने मृत्यू होइपर्यंतचे सर्व हप्ते नियमितपणे भरले असतील, तर त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीला विम्याची रक्कम, तसंच पॉलिसीच्या प्रकारानुसार काही बोनस लागू असेल तर तो मिळतो.

First published:

Tags: Bank, Insurance, LIC