LIC पॉलिसीधारकांसाठी मोठी बातमी! 30 नोव्हेंबरपासून बंद होणार अनेक प्लान

LIC पॉलिसीधारकांसाठी मोठी बातमी! 30 नोव्हेंबरपासून बंद होणार अनेक प्लान

IRDA च्या लाइफ इन्श्यूरन्स प्रॉडक्टच्या नव्या नियमानुसार बंद करण्यात येणाऱ्या पॉलिसी इन्श्यूरन्स रेग्युलेटरनुसार रिलॉन्च केल्या जाण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम म्हणजेच एलआयसीची पॉलिसी तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. एलआयसी 30 नोव्हेंबरपासून 24 हून अधिक पॉलिसी बंद करणार आहे. इन्श्यूरन्स रेग्युलेटरी IRDA च्या लाइफ इन्श्यूरन्स प्रॉडक्ट च्या नव्या नियमावलीनुसार एलआयसी जुन्या पॉलिसी बंद करणार आहे. जुन्या पॉलिसी असलेल्यांच्या पॉलिसी किंवा त्यांच्या पॉलिसी किंवा त्यातून मिळणाऱ्या फायद्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही.

बंद करण्यात येणाऱ्या पॉलिसिमध्ये एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसी, जीवन उमंग, जीवन लक्ष्य आणि जीवन लाभ यासारख्या पॉलिसींचा समावेश आहे. एलआयसीच्या माहितीनुसार कंपनीच्या प्रोडक्टच्या बुकेमध्ये कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांना आणखी चांगले पर्याय मिळतील.

IRDA च्या लाइफ इन्श्यूरन्स प्रॉडक्टच्या नव्या नियमानुसार बंद करण्यात येणाऱ्या पॉलिसी इन्श्यूरन्स रेग्युलेटरनुसार रिलॉन्च केल्या जाण्याची शक्यता आहे. सध्या रिवाइव्ह किंवा रिलॉन्च करण्यात येणाऱ्या प्रोडक्टमध्ये कमी बोनस दर आणि जास्त प्रीमियम दर मिळू शकतात. नव्या पॉलिसींवर जास्त प्रीमियमसोबत असण्याची शक्यता आहे. याशिवाय अलर्टेड फीचर्स असतील.

वाचा : एका पेक्षा जास्त बँकेत खाती असतील तर सावधान, होऊ शकतं मोठं नुकसान

LIC चे काही असे प्रोडक्ट आहेत जे जास्त रिटर्न आणि जास्त बोनस देतात. त्यामधील काही कमी केली जाऊ शकतात. मात्र ग्राहकांना आणखी चांगले पर्याय उपलब्ध होतील असं एलआयसीने म्हटलं आहे.

वाचा : FD ऐवजी लोक इथे गुंतवतायत पैसे, तुम्हालाही होईल फायदा

Published by: Suraj Yadav
First published: November 17, 2019, 11:02 AM IST
Tags: LIC

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading