मराठी बातम्या /बातम्या /मनी /

मोठी बातमी! 'या' बँकेतील भागीदारी सरकार विकण्याच्या तयारीत

मोठी बातमी! 'या' बँकेतील भागीदारी सरकार विकण्याच्या तयारीत

आयडीबीआय बँक 51% पेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक ग्राहकांना आकर्षित करू शकते.

आयडीबीआय बँक 51% पेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक ग्राहकांना आकर्षित करू शकते.

आयडीबीआय बँक 51% पेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक ग्राहकांना आकर्षित करू शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : तुमच्या जर या बँकेत शेअर असेल किंवा खातं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. IDBI बँक ही सर्वात मोठी बँक आहे. आयडीबीआय बँक 51% पेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक आकर्षित करू शकते.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी फंड मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकतात. विदेशी फंड 51% पेक्षा जास्त घेऊ शकतात. या बातमीनंतर हा शेअर 9 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मंगळवारी हा शेअर 58.30 रुपयांच्या किंमतीवर बंद झाला. शेअरमध्ये 7.50 टक्के वाढ झाली आहे.

IDBI बँक कोणाकडे किती हिस्सेदारी?

CNBC आवाजने दिलेल्या माहितीनुसार LIC जवळ आयडीबीआय बँकेची 49.24 हिस्सेदारी आहे. केंद्र सरकारकडे 45.48 टक्के भागीदारी आहे. सरकार यापैकी 30.48 टक्के आणि LIC आपली 30.24 टक्के भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे. दोन्ही भागीदारी मिळून आयडीबीआय बँकेत 60.72 टक्के भागीदारी होते. याचा अर्थ अर्ध्याहून अधिक भागीदारी सरकारला विकायची आहे.

पहिला पगार झाल्यावर त्वरित करा ‘हे’ काम! मिटेल आयुष्याचं टेन्शन

IDBI बँकेच्या शेअरने गेल्या आठवड्यात 8 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत. एका महिन्यात ३० टक्के आणि ३ महिन्यात ३४ टक्के तर एका वर्षात २९ टक्के रिटर्न्स दिले आहेत.

आयडीबीआय बँकेबाबत आणखीही काही बातम्या आहेत - नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) 2023 मध्ये आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहे. मनीकंट्रोलच्या म्हणण्यानुसार, देशातील पहिली डिपॉझिटरी सर्व्हिसेस फर्म एनएसडीएल नवीन वर्षात आयपीओ आणत आहे.

budget 2023 : सोन्याचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

आयडीबीआय बँक आणि एनएसईने एनएसडीएलमध्ये गुंतवणूक केली आहे. या इश्यूसाठी एनएसडीएल ७ गुंतवणूक बँकांची निवड करू शकते. यामध्ये आयसीआयसीआय सिक्युरिटीज, अॅक्सिस कॅपिटल, एचएसबीसी सिक्युरिटीज, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स, एसबीआय कॅपिटल, एचडीएफसी बँक आणि आयडीबीआय कॅपिटल यांचा समावेश आहे.

First published:

Tags: Bank services