LIC AAO Recruitment 2019 : अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्याची ही आहे शेवटची तारीख

LIC AAO Recruitment 2019 : अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्याची ही आहे शेवटची तारीख

LIC च्या नोकरीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्याची 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. 5 आणि 6 मे रोजी या परीक्षा होतील.

  • Share this:

मुंबई, 22 एप्रिल : LIC AAO Admit Card आज वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आहेत. LIC च्या असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. LIC या परीक्षेच्या माध्यमातून 590 जागा भरणार आहे. या परीक्षेची प्रवेशपत्रिका LIC च्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आहे. या पदांसाठीच्या परीक्षा पुढच्या महिन्याच्या 5 आणि 6 तारखेला होणार आहेत.

डाऊनलोड करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे. या तारखेनंतर परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यात येणार नाही.

LIC च्या भरती प्रक्रियेअंतर्गत LIC AAO परीक्षेच्या माध्यमातून 590 जागा भरायच्या आहेत. त्यातल्या 237 जागा खुल्या वर्गातल्या आहेत. तर 144 ओबीसींसाठी आरक्षित आहेत.

ऑनलाईन अॅडमिट कार्ड कसं डाऊनलोड करायचं?

LIC AAO 2019चं अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी या आहेत स्टेप्स

1. licindia.in या वेबसाईटवर जाऊन LIC AAO Admit Card 2019 हे फुटर दिसेल

2. ‘careers’ या URL लिंकवर क्लिक करा आणि तिथून LIC AAP Admit Card डाऊनलोड करा.

3. ‘AAO Recruitment 2019’ या लिंकव जा आणि LIC AAO Recruitment 2019 टॅब क्लिक करा.

4. या टॅबवर LIC AAO 2019 Admit Card/ Hall Ticket window या दोनपैकी एक लिंकवर तुम्ही जाल.

5. LIC AAO Admit Card 2019 च्या रजिस्ट्रेशनचे डिटेल्स द्या आणि तुमची जन्मतारिख व्यवस्थित सीक्वेन्सने लिहा.

6. LICच्या परीक्षेसाठी इथे तुम्हाला डाउनलोड करता येईल.

अॅडमिट कार्ड डाऊनलोड केल्यावर त्यावर तुमचं परीक्षा केंद्र, परीक्षेची वेळ नीट बघून घ्या. 5 आणि 6 मे रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. LIC AA0 2019 प्रीलिम्स आणि मेन्स परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांचा 590 पदांसाठी विचार होईल.

VIDEO : राष्ट्रवादी नेत्याच्या घरावर गुंडांचा भीषण हल्ला

First published: April 22, 2019, 6:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading