Home /News /money /

LIC Scheme: महिलांना लखपती होण्याची संधी, दररोज 29 रुपयांच्या बचतीतून मिळवा 4 लाख

LIC Scheme: महिलांना लखपती होण्याची संधी, दररोज 29 रुपयांच्या बचतीतून मिळवा 4 लाख

LIC Aadhar Shila Yojana: या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्ही काही वर्षांत लाखो रुपये कमावू शकता. हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. महिलांचं हित लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे.

मुंबई, 23 जानेवारी: कमी गुंतवणुकीत (Saving and investment) चांगले रिटर्न्स देणाऱ्या योजनेच्या शोधत असाल, तर तुम्हाला भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC New Scheme) या योजनेबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्ही काही वर्षांत लाखो रुपये कमवू शकता. हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. महिलांचं हित लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. 'एलआयसी आधार शिला योजना' (LIC Aadhar Shila Yojana) असं या योजनेचं नाव आहे. एलआयसी त्यांच्या ग्राहकांसाठी वेळोवेळी जबरदस्त योजना ऑफर करत असते. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या अशाच एका सर्वोत्तम योजनेबद्दल सांगणार आहोत. नागरिकांचा एलआयसीच्या पॉलिसीवर विश्वास असतो. कारण त्यात धोका कमी असतो. त्यातच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एलआयसीने विशेष योजना आणली आहे. ती म्हणजे 'एलआयसी आधार शिला योजना.' या योजनेअंतर्गत काढलेली पॉलिसी तुम्हाला लाखो रुपये मिळवून देऊ शकते. तुम्ही दररोज फक्त 29 रुपयांची बचत करून यात गुंतवणूक करायची. पॉलिसीची मुदत संपल्यानंतर तुम्हाला तब्बल 4 लाख रुपये मिळू शकतात. एलआयसीची ही योजना महिलांचं हित लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. योजनेअंतर्गत 8 ते 55 वर्षं वयोगटातल्या महिला गुंतवणूक करू शकतात. हे वाचा-Adani Wilmar IPO 27 जानेवारीला येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी काय आहे कॅलक्यूलेशन? एलआयसी आधार शिला योजनेत गुंतवणूक केल्यानंतर लाखो रुपये कसे मिळतील, हे आता समजून घेऊ. समजा तुमचं वय 30 वर्षं असेल आणि 20 वर्षं तुम्ही दररोज 29 रुपये जमा केले, तर पहिल्या वर्षी तुमच्याकडे एकूण 10,959 रुपये जमा होतील. आता त्यातही 4.5 टक्के टॅक्स लागणार आहे. पुढील वर्षी तुम्हाला 10,723 रुपये द्यावे लागतील. अशा प्रकारे, तुम्ही हे प्रीमियम प्रत्येक महिना, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर जमा करू शकता. नियमित प्रीमियम भरल्यानंतर तुमचे 20 वर्षांमध्ये 2,14,696 रुपये जमा होतील. प्रत्यक्षात मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला एकूण 3,97,000 रुपये मिळतील. हे वाचा-Axis Bank मध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणार अधिक व्याज, काय आहेत नवे व्याजदर? एलआयसी आधार शिला योजनेअंतर्गत कमीतकमी 75000 रुपये आणि जास्तीत जास्त 3 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. या पॉलिसीचा मॅच्युरिटी कालावधी कमीत कमी 10 वर्षं आणि जास्तीत जास्त 20 वर्षं आहे. या योजनेच्या मॅच्युरिटीवेळी पॉलिसीधारकाचं वय जास्तीत जास्त 70 वर्षं असू शकतं. या योजनेचा प्रीमियम भरणा मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर करता येईल. 'एलआयसी'ची आधार शिला योजना त्यांच्या ग्राहकांना संरक्षण आणि बचत दोन्ही वैशिष्ट्यं पुरवते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
First published:

Tags: Money

पुढील बातम्या