• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • महत्त्वाची बातमी! LIC मध्ये होतोय मोठा बदल, उद्यापासून लागू होणार नियम

महत्त्वाची बातमी! LIC मध्ये होतोय मोठा बदल, उद्यापासून लागू होणार नियम

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी असणाऱ्या LIC मध्ये एक मोठा बदल होणार होणार आहे, हे नवे नियम सोमवार 10 मे पासून लागू होणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 09 मे: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी (Insurance Company) असणाऱ्या LIC मध्ये एक मोठा बदल होणार होणार आहे, हे नवे नियम सोमवार 10 मे पासून लागू होणार आहेत. LIC कडून अशी माहिती देण्यात आली आहे की, 10 मे पासून त्यांची सर्व कार्यालयं आठवड्यातून पाच दिवस काम करतील. शनिवारी देखील आता LIC मध्ये साप्ताहिक सुट्टी असेल. कंपनीने एका सार्वजनिक नोटीसमध्ये असं म्हटलं आहे 15 एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या सरकारच्या अधिसुचनेनुसार विमा कंपनीसाठी शनिवारला देखील साप्ताहिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. LIC ने नोटीस जारी करत दिली सूचना LIC ने एक अधिकृत नोटीस जारी करत या निर्णयाबाबत सूचना दिली आहे. या नवीन वर्क कल्चरनुसार 10 मे पासून LIC ऑफिस आठवड्यातील पाच दिवस, सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत सुरू असतील. ऑनलाइन पूर्ण करा कामं LIC कडून त्यांच्या ग्राहकांना ऑनलाइन सुविधा देखील पुरवली जाते. तुम्ही https://licindia.in/ या अधिकृत वेबसाइटवर बहुतांश कामं पूर्ण करू शकता. याशिवाय एलआयसीने कोरोनाच्या संकटकाळात (Coronavirus Pandemic) ग्राहकांची असुविधा लक्षात घेता क्लेम्सबाबत असणाऱ्या अटी शिथील केल्या आहेत. हे वाचा-पुढे 8 दिवस बंद राहणार बँका, कोरोना काळात खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा यादी LIC च्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार याशिवाय LIC च्या कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढ मिळेल. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक सेवा विभागाने वेतन संशोधन बिलला मंजुरी दिली आहे. या सुधारणेमुळे एक लाखापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या विधेयकामध्ये 16 टक्के वाढ नमुद करण्यात आली आहे. अहवालात हे देखील नमुद करण्यात आले आहे की एलआयसीच्या कर्मचाऱ्यांना एक विशेष भत्ता देखील दिला जाईल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: