Home /News /money /

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तिकिट रद्द केल्यास अशी मिळेल 5000 पर्यंतची रक्कम

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तिकिट रद्द केल्यास अशी मिळेल 5000 पर्यंतची रक्कम

लिबर्टी जनरल इन्शूरन्सने (Liberty General Insurance) त्यांच्या ग्राहकांसाठी खास स्कीम सुरू केली आहे. फ्लिपकार्ट (Flipkart) वरून जे लोक फ्लाइट तिकिट बुक करतील त्यांना लिबर्टीच्या या खास ऑफरचा फायदा होईल.

    मुंबई, 03 सप्टेंबर : लिबर्टी जनरल इन्शूरन्सने (Liberty General Insurance) त्यांच्या ग्राहकांसाठी खास स्कीम सुरू केली आहे. फ्लिपकार्ट (Flipkart) वरून जे लोक फ्लाइट तिकिट बुक करतील त्यांना लिबर्टीच्या या खास ऑफरचा फायदा होईल. कंपनीने फ्लिपकार्टवर लिबर्टी सिक्योर ट्रॅव्हल नावाचे विमा उत्पादन (Insurance Product) लाँच केले आहे.  फ्लिपकार्टच्या फ्लाइट बुकिंग प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना नाममात्र रक्कम देऊन झिरो कॅन्सलेशन ऑफरचा  (Zero Cancellation Offer) लाभ मिळू शकेल. याचा फायदा अशा ग्राहकांना होईल, जे कोणत्याही कारणास्तव प्रवास करू शकत नाहीत आणि त्यांना तिकीट रद्द करावे लागेल. लिबर्टीच्या या नवीन उत्पादनाखाली ग्राहकांना तिकिटे रद्द करताना कोणताही दंड भरावा लागणार नाही. यामुळे त्यांना तिकीट रद्द करताना अधिक त्रास होणार नाही. 5 हजार रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई लिबर्टी सिक्योर ट्रॅव्हल अंतर्गत ग्राहकांना कोणत्याही कारणाने फ्लाइट रद्द करण्याची सुविधा मिळेल. वैद्यकीय कारणे, प्लॅनमध्ये बदल किंवा इतर कोणतेही कारण असू शकते. या धोरणांतर्गत ग्राहक प्रवासाच्या वेळेच्या 24 तास आधी तिकिट रद्द करू शकतात. लिबर्टी ग्राहकांच्या 5 हजार रुपयांपर्यंतच्या नुकसानीची भरपाई करेल. (हे वाचा-विदेशी बाजारात सलग दुसऱ्या दिवशी उतरले सोन्याचे दर, भारतात होईल हा परिणाम) या पॉलिसीबाबत माहिती देताना लिबर्टी जनरल इन्शुरन्सचे सीईओ रूपम अस्थाना म्हणाले की, यामुळे भारतीय ग्राहकांना मदत होईल. तिकिटे रद्द करताना त्यांना रिफंडची चिंता करावी लागणार नाही.  जेव्हा कोरोनाचे संकट संपेल तेव्हा ग्राहक या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा घेता येईल. (हे वाचा-दीड लाखांपर्यंत पगार? कोरोना संकटात ही कंपनी देणार 20000 महिलांना नोकरी) ट्रिप कॅन्सलेशन चार्जची जास्तीत जास्त 5000 रुपयांपर्यंत भरपाई मिळू शकेल. अॅक्सिडेंटल डेछ इन्शूरन्सची रक्कम 5 लाख असेल.  ही पॉलिसी 3 महिने ते 70 वर्षे वयाच्या कोणत्याही व्यक्तीसाठी असेल. हे धोरण डोमेस्टिक विमान प्रवासासाठी वैध असेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या