फक्त 72 तासांत बिझनेस सुरू करण्यासाठी मिळणार पैसे, इथे करा अर्ज

फक्त 72 तासांत बिझनेस सुरू करण्यासाठी मिळणार पैसे, इथे करा अर्ज

तुम्हाला बिझनेस सुरू करण्याची इच्छा असेल तर एक खूप चांगली संधी आहे. बिझनेस सुरू करण्यासाठी सुरुवातीचं भांडवल, कर्जासाठी तारण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे सगळं उपबल्ध करून देण्यासाठी फिनटेक ही कंपनी तुमच्या मदतीला आलीय.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 डिसेंबर : तुम्हाला बिझनेस सुरू करण्याची इच्छा असेल तर एक खूप चांगली संधी आहे. बिझनेस सुरू करण्यासाठी सुरुवातीचं भांडवल, कर्जासाठी तारण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे सगळं उपबल्ध करून देण्यासाठी फिनटेक ही कंपनी तुमच्या मदतीला आलीय. स्टार्ट अप लेंडिगकार्टमुळे कर्ज मिळणंही सोपं होतं.

गुजरातची ही कंपनी केवळ 72 तासांत कोलेट्रल फ्री कर्ज देतं. हे कर्ज 3 वर्षांसाठी दिलं जातं. त्याचबरोबर 2 कोटी रुपयांपर्यंत स्टार्टअप लेंडिंगकार्टचीही सुविधा आहे.

नव्या बिझनेससाठी वर्किंग कॅपिटल

2014 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत Lendingkart ने 70 हजार ग्राहकांना साडेचार कोटी रुपयांचं कर्ज दिलं आहे. कंपनी 6 महिन्यांपासून ते 3 वर्षांपर्यंत 5 लाख रुपयांचं कर्ज देते. या कर्जाची रक्कम बिझनेस वर्किंग कॅपिटल म्हणून वापरता येते.

या व्यवसायासाठी कर्ज

Lendingkart चे सहसंस्थापक हर्षवर्धन लुनिया यांनी अ‍ॅडव्हायझरी बिझनेसमध्ये काम केलं होतं. पण कर्जपुरवठ्याचा अनुभव नवा होता. लुनिया सांगतात, आम्हाला अशी टीम पाहिजे होती की जी टीम हे प्रत्यक्षात आणू शकेल. ज्यांना कर्ज द्यायचं आहे त्यांना न भेटताही त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म बनवायचा होता. काही जण कर्जासाठी भांडवलदारही हवे होते. अशा सगळ्या आव्हानांवर आम्ही सध्या उपाय काढतोय.

(हेही वाचा : खूशखबर! Jio चा सगळ्यात परवडणारा 'ऑल इन वन प्लॅन')

मेट्रोसिटीमध्ये जम

Lendingkart या कंपनीने मुंबई, दिल्ली, एनसीआर, कोलकाता आणि अहमदाबाद या शहरांत आपला जम बसवला आहे. त्याशिवाय 1300 शहरांमध्ये छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज दिलं आहे.

कोचिंग क्लासेस, कॉम्प्युटर अ‍ॅकॅडमी, मोबाइल फोनची विक्री, कपडे व्यापारी, टू व्हीलर रिपेअर अशा व्यवसायांसाठी कर्ज दिलं जातं.

==========================================================================================

First published: December 6, 2019, 4:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading