उन्हाळा सुरु झाला की, लिंबाचे भाव हे गगणाल भीडतात. उन्हाळ्यातील सरबतामुळे गारवा देणाऱ्या या लिंबांनी आतापासूनच सामान्य नागरिकांना रडवायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून लिंबाचे भाव हे वाढले आहेत. दिल्लीमध्ये जानेवारी महिन्यातच 80 आणि 100 रुपये किलोंनी मिळणारा लिंबू आता 150 ते 170 प्रति किलोने मिळतोय. लिंबूची सर्वात जास्त मागणी ही उन्हाळ्यात असते. याच कारणामुळे बाजारात गेल्या आठवड्यापासून लिंबाचा भाव हा वाढलाय.
घाऊक बाजारात दर वाढल्याने किरकोळ बाजारातही लिंबाच्या किंमती या वाढत आहेत. दोन महिन्यांपूर्वी बाजारात 10 रुपयांना 3 ते 4 लिंबू मिळत होते. मात्र आता एवढ्या पैशात दोनच लिंबू मिळताय. किरकोळ बाजारात मोठे आणि सुंदर लिंबू आता 10 ते 15 रुपयांना मिळतात. त्याचबरोबर सामान्य आकाराचे दोन ते तीन लिंबू 10 रुपयांना मिळतात.
आझादपूर सब्जी मंडीचे व्यापारी वरुण चौधरी न्यूज 18 हिंदीशी बोलताना म्हटले की, बाजारात लिंबू नाही. गेल्या काही दिवसांपासून लिंबाची आवक पहिल्या प्रमाणेच होते. मात्र बाजारात मागणी वाढली आहे. बाजारात वापरानुसार लिंबाचा पुरवठा होत नाही. आझादपूर मंडईत महिन्याभरापूर्वी लिंबू 60 ते 70 रुपये किलोने मिळायचे, पण आता लिंबाचा भाव हा तिप्पट झालाय.
गाझियाबादच्या वैशाली सेक्टरमध्ये राहणाऱ्या पूजा कौशिक म्हणतात की, 'लिंबाच्या वाढत्या किमतीमुळे चिंता वाढली आहे. आम्ही साहिबाबाद भाजी मंडईतून लिंबू खरेदी करतो. गेल्या काही दिवसांपासून येथेही लिंबाच्या किंमती वाढल्या आहेत. हीच स्थिती राहिल्यास मे-जूननंतर लिंबू 200 रुपये किलोपेक्षा जास्त दराने खरेदी करण्याचे आव्हान जनतेसमोर असेल.'
महत्त्वाचं म्हणजे, लिंबाचे सर्वाधिक उत्पादन गुजरातमध्ये होते. परंतु तीन वर्षांपूर्वी येथे जोरदार चक्रीवादळामुळे लिंबाची झाडे पडली होती. लिंबाचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या भावनगरमध्ये या वादळाचा तडाखा 80 टक्के झाडांना बसला होता. लिंबाची झाडे वाढण्यास आणि पीक घेण्यास वेळ लागतो. अशा स्थितीत लिंबू पीक नष्ट झाल्याने आवक घटली. आता तर उन्हाळा सुरू झालाय यामुळे मागणी वाढली आहे. त्यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये लिंबाचे भाव आतापासूनच गगनाला भिडू लागले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.