S M L

RBI नं स्वस्त केलं गृहकर्ज आणि आॅटो लोन, जाणून घ्या कसा होईल फायदा

रिझर्व्ह बँकेचं यंदाच्या आर्थिक वर्षातील पतधोरण जाहीर करण्यात आलं.

Updated On: Apr 4, 2019 12:50 PM IST

RBI नं स्वस्त केलं गृहकर्ज आणि आॅटो लोन, जाणून घ्या कसा होईल फायदा

मुंबई, 04 एप्रिल : रिझर्व्ह बँकेचं यंदाच्या आर्थिक वर्षातील पतधोरण जाहीर करण्यात आलं. या पतधोरणात 0.25 पॉईंटची कपात करण्यात आलीय. त्यामुळे आता रेपो रेट 6.25 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर आलाय. बँकांनी रेपो रेटमधील कपातीचा फायदा सर्वसामान्य कर्जदारांना दिल्यास हफ्ता कमी होऊ शकतो. त्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळू शकतो.

या निर्णयामुळे सर्वसामान्यांचं ईएमआय आता कमी होईल. RBIचे नवे गव्हर्नर शशिकांत दास यांच्या कार्यकाळातली ही दुसरी रिव्ह्यू मीटिंग आहे. यामुळे आता फक्त MSMEला फायदा होणार नाही, तर फ्लोटिंग रेटवर गृहकर्ज आणि आॅटोलोन घेणाऱ्यांना जास्त फायदा होईल.

भारतीय रिझर्व्ह बँकनं कर्ज घेणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या कॅटेगरीच्या फ्लोटिंग व्याज दरात आता एक्सटर्नल बेंचमार्कमधून लिंक्ड होईल. RBIनं MCLRला एक्सटर्नल बेंचमार्कमधून रिप्लेस करण्याचा प्रस्ताव दिलाय. RBIनं डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी पाॅलिसीजच्या आपल्या घोषणापत्रात प्रस्ताव ठेवला होता की एप्रिल 2019पासून बँक आता असलेल्या प्राइम लेंडिंग रेट, बेस रेट, मार्जनल काॅस्ट आॅफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR )च्या जागी एक्सटर्नल बेंचमार्क्सचा वापर करेल.


फेब्रुवारीतही रिझर्व्ह बँकेनं सामान्यांना मोठा दिलासा दिला होता. या पतधोरणामध्ये रिझर्व्ह बँकेनं रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात पाव टक्क्यांची कपात जाहीर केली होती त्यामुळे रेपो दर 6.25 टक्के तर, रिव्हर्स रेपो दर 6 टक्के झाला होता.


VIDEO: पार्थ यांच्याबद्दल काय म्हणाल्या आई सुनेत्रा पवार?

Loading...



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2019 12:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close