10 हजारांची गुंतवणूक, महिन्याला 30 हजाराची कमाई, पटापट जाणून घ्या हा व्यवसाय

10 हजारांची गुंतवणूक, महिन्याला 30 हजाराची कमाई, पटापट जाणून घ्या हा व्यवसाय

या व्यवसायाची सुरुवात घरातूनही करता येईल. व्यवसाय वाढायला लागला की तुम्ही वेगळ्या जागेचा विचार करू शकता.

  • Share this:

मुंबई, 25 मे : प्रत्येकाच्या जेवणात एक पदार्थ नेहमीच असतो. तो म्हणजे लोणचं. तुम्ही पराठ्यासोबत खा किंवा वरणभाताबरोबर खा. लोणची अनेक प्रकारची असतात. कुठल्याही मोसमात लोणचं खाल्लं जातं. तुम्हाला व्यवसाय करायचाय तर मग तुम्ही लोणच्याच्या व्यवसायाचा का विचार करत नाही?

लोणच्याच्या व्यवसायासाठी जागेची निवड

या व्यवसायाची सुरुवात घरातूनही करता येईल. व्यवसाय वाढायला लागला की तुम्ही वेगळ्या जागेचा विचार करू शकता. लोणची बनवण्यासाठी 900 स्क्वेअर फुट जागेची गरज असते.  लोणची तयार करणं, ती पॅक करणं यासाठी जागा लागते. लोणची खूप काळ टिकावीत, खराब होऊ नयेत यासाठी खूप स्वच्छताही ठेवावी लागते.

इथे ऑनलाइन करा गुंतवणूक, सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्त मिळेल व्याज

10 हजार रुपयांपासून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता

घरून हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी 10 हजार रुपयांची गरज लागते. त्यात तुमची 25 ते 30 हजार रुपये कमाई होते. ही कमाई तुमच्या उत्पादनाला मागणी, पॅकिंग आणि एरियावर अवलंबून असते. तुम्ही लोणची आॅनलाइन, रिटेल मार्केटमध्ये, रिटेल चेननं विकू शकता.

World Cup : विराटचं टेंशन वाढलं, सामन्याआधीच महत्त्वाचा खेळाडू जखमी

या व्यवसायात किती फायदा?

लोणची बनवण्याच्या व्यवसायात तुम्ही 10 हजार रुपये गुंतवलेत तर दुप्पट फायदा होऊ शकतो. पहिल्यांदा विक्रीत गुंतवलेले पैसे वसूल होतात आणि त्यानंतर फायदाच फायदा होतो. या छोट्या व्यवसायाला तुम्ही मेहनतीनं मोठा करू शकता.

पार्थच्या धक्कादायक पराभवानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

लोणची बनवण्याचं लायसन्स कसं मिळतं?

लोणची तयार करण्याच्या व्यवसायासाठी लायसन्सची गरज लागते. हे लायसन्स सेफ्टी अँड स्टॅण्डर्ड अथोरिटी (FSSAI) कडून घेता येतो. त्यासाठी आॅनलाइन अर्ज करता येतो.

माजी आमदाराच्या कार्यक्रमात पैशांचा पाऊस, VIDEO व्हायरल

First published: May 25, 2019, 11:06 AM IST
Tags:

ताज्या बातम्या