RBI घेऊन येतेय 50 रुपयांची नवी नोट, जाणून घ्या काय आहे खास

RBI घेऊन येतेय 50 रुपयांची नवी नोट, जाणून घ्या काय आहे खास

RBIनं सांगितलंय की नवी नोट चलनात आली तरी जुनी 50ची नोटही चालणार आहे. ती वैधच आहे.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : आरबीआय ( भारतीय रिझर्व्ह बँक )नं 50 रुपयांची नवी नोट आणणार आहे. या नोटेवर RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असेल. शशिकांत दास यांच्या सहीची ही पहिली नोट असेल. या नोटेचं डिझाइन महात्मा गांधींचा फोटो असणाऱ्या नोटेसारखंच आहे. RBIनं सांगितलंय की नवी नोट चलनात आली तरी जुनी 50ची नोटही चालणार आहे. ती वैधच आहे.

शक्तिकांत दास यांच्या सहीची पहिली नोट - उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर डिसेंबर 2018मध्ये शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बनले. ते रिझर्व्ह बँकेचे 25वे गव्हर्नर आहेत. त्यांच्या कार्यकाळातली ही पहिली नोट आहे.

2017मध्ये RBIने 50 रुपये आणि 200 रुपयांची नोट आणली होती, ती अजून चलनात आहे.

या नोटेच्या मागे रथासोबत हम्पीचा फोटो आहे. नवी नोट फ्लोरिसेंट ब्लू रंगाची आहे. मधोमध महात्मा गांधींचा फोटो आहे.

61 वर्षांचे शक्तिकांत दास हेसुद्धा नावाजलेले अर्थतज्ज्ञ आहेत. नोटाबंदीच्या काळात ते अर्थसचिव होते. त्यामुळे नोटाबंदीच्या मोठ्या आणि अवघड निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी दास यांनीच पार पाडली.

20 ऑगस्ट 2016 रोजी उर्जित पटेल यांनी आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा कारभार स्वीकारला होता. त्यांच्या नियुक्तीनंतर आरबीआय आणि सरकारमध्ये खटके उडाले होते. मध्यंतरी रिझर्व बँक आणि सरकार यांच्यातला तणाव वाढला होता. सरकार RBIला इथून पुढेही सल्ले देत राहील, अशी स्पष्टोक्ती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली होती. त्यामुळे हा वाद आणखी पेटला.

खरं तर मोदी सरकारनंच उर्जित पटेल यांची नेमणूक केली होती. माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या जागेवर पटेल यांची नियुक्ती झाली होती.

पवारांनी कुटुंबाबाबत केलेल्या टीकेला मोदींकडून पहिल्यांदाच प्रत्युत्तर, पाहा VIDEO

First published: April 17, 2019, 1:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading