Home /News /money /

नववर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा भडका, घरगुती गॅसपाठोपाठ पेट्रोल-डिझेल महाग

नववर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा भडका, घरगुती गॅसपाठोपाठ पेट्रोल-डिझेल महाग

तुमच्या शहरात काय आहेत आजचे इंधनाचे दर जाणून घ्या.

    मुंबई, 02 जानेवारी: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोल डिझेलच्या दरात बदल झाला नसला तरी गुरुवारी मात्र पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 11 तर कोलकाता इथे 8 पैसे प्रतिलिटर महाग झालं आहे. डिझेलचे दर दिल्लीत 11, कोलकाता इथे 14 पैसे तर मुंबई आणि चेन्नईमध्ये 12 पैसे लिटरमागे दरवाढ झाली आहे.यासोबत रेल्वे तिकीटाचे दर आणि अनुदानित गॅसही वाढला आहे. महागाइनं डोकेदुखी झाली आहे. पेट्रोल डिझेलपासून ते भाज्यांपर्यंत दिवसेंदिवस दरवाढ चढत्या क्रमानं होत आहे. इंडियन ऑईलने आपल्या वेबसाईटवर जारी केलेले दर पुढील प्रमाणे आहेत. दिल्ली- पेट्रोल- 75.25 रुपये डिझेल- 68.10 रुपये. मुंबई- पेट्रोल- 80.87 रुपये डिझेल- 71.43 रुपये. कोलकाता- पेट्रोल- 77.87 रुपये डिझेल- 70.49 रुपये. चेन्नई- पेट्रोल- 78.20 रुपये डिझेल- 71.98 रुपये. सकाळी 6 वाजता किंमतींमध्ये होतो बदल पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येक दिवशी वाढ तसंच घट पाहायला मिळते. सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात. हेही वाचा-आर्थिक मंदीतही मोठा दिलासा, या गाड्यांच्या विक्रीत झाली मोठी वाढ आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे. कंपनी आणि क्रमांकाची सुविधा इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड> 92249 9 2249 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122 या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील. मुंबई पेट्रोलचे सर्वाधिक म्हणजेच जवळपास 80 रुपये लिटरमागे दर आहे. तर दिल्लीमध्ये सर्वात कमी 76 रुपये पेट्रोलचा दर आहे. चेन्नईमध्ये डिझेलचे दर सर्वाधिक 71.98 तर सर्वात कमी दर दिल्लीत आहे. नव्या वर्षात रेल्वेच्या भाड्यात 1 पैसे ते 4 पैसे प्रतिकिलोमीटरची वाढ झालीय. पॅसेंजर आणि फ्रेट अशा दोन्ही भाड्यांमध्ये बदल करण्याची ही योजना आहे पण आता फ्रेटसाठीचं भाडं आधीच जास्त असल्याने यामध्ये वाढ होणार नाही. पण पॅसेंजर ट्रेनच्या भाड्यात वाढ होईल. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत आजपासून वाढ होणार आहे. सलग चौथ्या महिन्यात गॅसच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामन्यांना मोठा दणका बसला आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये विना अनुदानित गॅसच्या किंमतीत 19 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. हेही वाचा-खूशखबर! सलग दुसऱ्या महिन्यात GST ची वसुली गेली 1 कोटींवर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Indian oil petrol pump, Petrol disel hike, Petrol pump

    पुढील बातम्या