पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा, 'या' 3 प्रकारे तुम्हीही पाहू शकता रोजच्या किमती

Petrol, diesel - इतके दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत होत्या. आज मात्र ग्राहकांना थोडा तरी दिलासा मिळालाय.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 12:10 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा, 'या' 3 प्रकारे तुम्हीही पाहू शकता रोजच्या किमती

मुंबई, 19 जुलै : पेट्रोल-डिझेलच्या किमती गेले काही दिवस वाढल्या होत्या. त्याची वाढ आज ( 19 जुलै ) थांबलीय. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यात. रुपयाही मजबूत झालाय. त्यामुळे ऑइल कंपनींनी पेट्रोल-डिझेलच्या दरात काही बदल केले नाहीत. शुक्रवारी ( 19 जुलै ) दिल्लीत 1 लीटर पेट्रोलचा दर 73.35 रुपये आहे. तर डिझेलची किंमत 66.24 रुपये प्रति लीटर झालीय. याशिवाय मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई इथे पेट्रोलच्या किमती स्थिर राहिल्यात.

पेट्रोल-डिझेलचे नवे दर

IOC च्या वेबसाइटवर असलेल्या दराप्रमाणे दिल्लीत पेट्रोल 73.35 रुपये आणि डिझेल 66.24 रुपये प्रति लीटर मिळतंय.  तर मुंबईत वाढलेल्या किमतीनंतर पेट्रोल 78.96 रुपये प्रति लीटर मिळतंय. तर डिझेल 69.43 रुपये प्रति लीटर मिळतंय. कोलकत्तामध्ये पेट्रल 75.77 रुपये आणि डिझेल 68.31 रुपये प्रति लीटर मिळतंय. चेन्नईत पेट्रोल 76.18 रुपये आणि डिझेल 69.96 रुपये प्रति लीटर मिळतेय.

10वी उत्तीर्ण झालेल्यांना नौदलात नोकरीची संधी, 'अशी' होईल फिटनेस चाचणी

असे पाहा पेट्रोलचे दर

Loading...

पेट्रोलचे दर जाणून घेण्यासाठी SMS करता येतो. इंडियन ऑयल ग्राहक RSP-डीलर कोड-92249 9 2249 वर मेसेज करू शकतो. बीपीसीएल  RSP-डीलर कोड- 9223112222 वर मेसेज करू शकतो. एचपीसीएल ग्राहक HPPRICE-डीलर कोड- 9222201122 इथे मेसेज करू शकतो.

पुन्हा सोनं झालं महाग, 'हा' आहे 10 ग्रॅमचा दर

या ऑइल कंपन्यांचे अॅपही आहेत. त्यामार्फतही पेट्रोल - डिझेलचे भाव कळू शकतात. इंडियन ऑयलचं Fuel@IOC, बीपीसीएल ग्राहक SmartDrive अॅप, तर एचपीसीएलचं My HPCL अशी अॅप्स आहेत.

Income Tax रिटर्न भरताना खोट्या भाडेपावत्या देत असाल तर 'असे' याल अडचणीत

याशिवाय ऑइल कंपन्यांच्या वेबसाइट्स आहेत. इंडियन ऑयलचीवेबसाइट www.iocl.com, बीपीसीएलची वेबसाइट www.bharatpetroleum.com, एचपीसीएलची  www.hindustanpetroleum.com इथेही तुम्हाला रोजचे दर कळू शकतात.

सकाळी 6 वाजता ठरतात दर

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

VIDEO: विद्यार्थिनीची रोडरोमिओनं काढली छेड; स्थानिकांनी केली धुलाई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 12:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...