5 महिन्यात सर्वात महाग झालं पेट्रोल, 'हे' आहेत नवे दर

5 महिन्यात सर्वात महाग झालं पेट्रोल, 'हे' आहेत नवे दर

Petrol, diesel - आज पेट्रोल महाग झालंय. जाणून घ्या नवे दर

  • Share this:

मुंबई, 18 जुलै : पेट्रोलचे दर आज ( 18 जुलै ) वाढलेत. 8 ते 12 पैसे प्रति लीटर पेट्रोलमध्ये वाढ झालीय. तर डिझेलच्या दरात काही बदल झालेला नाही. गेले दोन दिवस पेट्रोलची किंमत वाढतच आहे. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोल 8 पैसे आहे, तर कोलकत्तामध्ये 12 पैसे आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर प्रति लीटर 9 पैसे आहे. देशातलं सर्वात महाग पेट्रोल परभणीत आहे. इथे 1 लीटर पेट्रोलचा दर 80.72 रुपये आहे.

पेट्रोल-डिझेलचे नवे दर

आयओसीच्या वेबसाइटप्रमाणे दिल्लीत पेट्रोस 73.35 रुपये आणि डिझेल 66.24 रुपये प्रति लीटर मिळतंय. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रालची किंमत 78.96 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 69.43 रुपये प्रति लीटर उपलब्ध आहे. कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत 75.77 रुपये प्रति लीटर आहे आणि डिझेलची 68.32 रुपये प्रति लीटर मिळतेय. चेन्नईत पेट्रोल 76.18 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 69.96 रुपये प्रति लीटर मिळतंय.

पुण्यात अवतरला नवा गोल्डन मॅन, दररोज घालतो फक्त 5 किलो सोनं?

सकाळी 6 वाजता ठरतात दर

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

ISROने जाहीर केली चांद्रयान-2च्या प्रक्षेपणाची नवी तारीख जाहीर!

लोकसभेतील पराभवानंतर पार्थ विधानसभा लढवणार? अजित पवार म्हणतात...

बजेटच्या दुसऱ्याच दिवशी वाढल्या होत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं ते काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार याकडे. दरम्यान, Petrol, Diesel आणि सोनं महाग झालं होतं. मुंबईतही इंधानाचे दर वाढले होते. अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलवर एक रुपया सेझ लावल्यानंतर पेट्रोल - डिझेलच्या किमतीत वाढ झाली होती. मुंबईत पेट्रोल 78.47 रुपये झालं होतं तर हेच पेट्रोलचे दर 5 जुलै रोजी 76.18 रुपये इतके होते.

VIDEO: निवडणुकीआधीच चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं आघाडीच्या गोटात खळबळ

First published: July 18, 2019, 11:58 AM IST
Tags: petrol

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading