News18 Lokmat

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दिलासा, पण लवकरच वाढणार दर

Petrol, Diesel - पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमती जाणून घ्या

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2019 11:56 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दिलासा, पण लवकरच वाढणार दर

मुंबई, 24 जुलै : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज ( 24 जुलै ) पुन्हा एकदा काही बदल झालेला नाही. डिझेलची किंमत आज 12व्या दिवशीही स्थिर राहिलीय. मंगळवारी ( 23 जुलै ) दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथे पेट्रोलच्या किमतीत 6 पैसे प्रति लीटर वाढ झालीय. तर कोलकत्तामध्ये पेट्रोलमध्ये  10 पैसे प्रति लीटर वाढ झालीय.

मध्य पूर्वेत असलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वद्धी पाहायला मिळाली. आखाती देशातल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी कच्च्या तेलाच्या किमती जास्त वाढल्या.

फक्त 5 हजार रुपये आणि 8वी पास, Post Office देतेय व्यवसायाची संधी

पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आज ( 24 जुलै ) दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई इथे पेट्रोलचे दर क्रमश: 73.41 रुपये, 79.02 रुपये, 75.87 रुपये आणि 76.24 रुपये प्रति लीटर आहेत. चारही महानगरांमध्ये डिझेलचे दर क्रमश: 66.24 रुपये, 69.43 रुपये, 68.31 रुपये आणि 69.96 रुपये प्रति लीटर आहे.

Loading...

'या' व्यवसायाला जास्त मागणी, महिन्याला 2 लाख रुपये कमाई नक्की

सकाळी 6 वाजता ठरतात दर

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

राज्याच्या राजकारणात अमोल कोल्हेंचं वजन वाढणार, राष्ट्रवादी देणार मोठी जबाबदारी

बजेटच्या दुसऱ्याच दिवशी वाढल्या होत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं ते काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार याकडे. दरम्यान, Petrol, Diesel आणि सोनं महाग झालं होतं. मुंबईतही इंधानाचे दर वाढले होते. अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलवर एक रुपया सेझ लावल्यानंतर पेट्रोल - डिझेलच्या किमतीत वाढ झाली होती. मुंबईत पेट्रोल 78.47 रुपये झालं होतं तर हेच पेट्रोलचे दर 5 जुलै रोजी 76.18 रुपये इतके होते.

भररस्त्यात पत्नीचा छळ; केस ओढून अमानुष मारहाण, घटनेचा CCTV VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Jul 24, 2019 11:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...