खूशखबर, आज पेट्रोल झालं स्वस्त, 'या' आहेत आजच्या किमती

खूशखबर, आज पेट्रोल झालं स्वस्त, 'या' आहेत आजच्या किमती

Petrol, Diesel - आज पेट्रोल स्वस्त तर डिझेलची किंमत स्थिर राहिलीय. जाणून घ्या शुक्रवारचे दर

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : आज शुक्रवारी पेट्रोलच्या किमतीत घट झालीय. पेट्रोल स्वस्त झालंय. पेट्रोलच्या किमतीत 2 पैशापासून 7 पैशापर्यंत घट झालीय. तर डिझेलची किंमत स्थिर राहिलीय. काल गुरुवारी ( 25 जुलै ) 12 दिवसांनंतर डिझेल स्वस्त झालं होतं.

दिल्लीत पेट्रोलचा भाव 6 पैशांनी कमी होऊन 73.29 रुपये प्रति लीटर झालाय. तर डिझेलची किंमत 66.18 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईतही पेट्रोल 6 पैशांनी कमी होऊन 78.90 रुपये प्रति लीटर झालंय. तर डिझेल 69.36 प्रति लीटर आहे.  कोलकत्तामध्ये पेट्रोल 75.83 रुपये तर डिझेल 68.29 रुपये प्रति लीटर झालंय.

सोन्या-चांदीचे भाव स्थिर, 'हे' आहेत गुरुवारचे दर

मध्य पूर्वेत असलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वद्धी पाहायला मिळाली. आखाती देशातल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी कच्च्या तेलाच्या किमती जास्त वाढल्या. त्यामुळे लवकरच या किमती वाढू शकतात.

पेट्रोल- डिझेलच्या किंमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मोदी सरकारने हे पाऊल उचललं तर पेट्रोल - डिझेल स्वस्त होऊ शकतं. पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटीमध्ये आणावं, अशी मागणी असोचॅमने केली आहे.

2 लाख रुपयात सुरू करा 'हा' व्यवसाय आणि महिन्याला कमवा 50 हजार

IOC म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलवर 34 रुपये 14 पैसे व्हॅट आणि एक्साइज ड्युटीसाठी दिले जातात. त्याशिवाय 3 रुपये 57 पैसे प्रित लिटर डिलर कमिशन आणि 15 रुपये 58 पैसे व्हॅटसाठी द्यावे लागतात. मालभाड्याचे 31 पैसे आकारले जातात.

पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत आलं तर काय होईल ?

पेट्रोलची जेवढी किंमत असते तेवढाच कर त्यावर भरावा लागतो. कच्चं तेल खरेदी केल्यानंतर ते रिफायनरीमध्ये नेलं जातं आणि नंतर शुद्ध झालेलं पेट्रोल मिळतं. अशा पेट्रोल आणि डिझेलवर कर द्यावा लागतो. सगळ्यात पहिल्यांदा सरकार अबकारी कर लावतं. त्यानंतर त्या त्या राज्यांतही कर लावला जातो. त्याला सेल्स टॅक्स किंवा व्हॅट म्हटलं जातं.

हे सगळे कर लागल्यानंतर पेट्रोल पंपाचा डीलर त्यावर आपलं कमिशन जोडतो. काही ठिकाणी उत्पादन शुल्काशिवाय अतिरिक्त करही लावला जातो. या सगळ्या करांमुळे राज्यांची कमाई वाढते.

पेट्रोल - डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर ते सामान्य माणसाच्या हिताचं ठरेल पण यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं नुकसान होऊ शकतं.

SPECIAL REPORT : औरंगाबादेत जबरदस्तीने म्हणून घेतलं 'जय श्रीराम', पण हे आहे सत्य!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Jul 26, 2019 11:07 AM IST

ताज्या बातम्या