खूशखबर! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण, 'हे' आहेत सोमवारचे दर

खूशखबर! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण, 'हे' आहेत सोमवारचे दर

Petrol, Diesel - पेट्रोल-डिझेलच्या किमती आज एकदम कमी झाल्यात. जाणून घ्या आजचे भाव

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : आज सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण झालीय. गेल्या आठवड्यात पेट्रोलचे दर कमी होते. पण डिझेलचे भाव स्थिर राहिले होते. देशाच्या मेट्रो शहरांमध्ये पेट्रेलचे दर जवळजवळ 15 पैसे आणि डिझेल जवळजवळ 12 पैशांनी कमी झालंय.

दिल्लीत आज ( 29 जुलै ) पेट्रोलची किंमत 72.99 रुपये प्रति लीटर आहे. म्हणजे त्यात 15 पैशांची घसरण झालीय. तर डिझेल 66.07 रुपये प्रति लीटर आहे. म्हणजे  11 पैसे कमी झालेत.

शरद पवारांकडून मोठा गौप्यस्फोट, CM फडणवीसांवरही गंभीर आरोप

हे आहेत नवे दर

दिल्लीत एक लीटर पेट्रोल 72.99 रुपये आणि डिझेल 66.07 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत 1 लीटर पेट्रोल 78.61 रुपये आणि डिझेल 69.25 रुपये, कोलकत्तामध्ये पेट्रोल 75.63 रुपये आणि डिझेल 68.22 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल 75.80 रुपये आणि डिढेल 69.78 रुपये आहे.

...तर अजित पवारांनी भाजपप्रवेश करायला हवा होता - उद्धव ठाकरे

असे पाहा पेट्रोलचे दर

पेट्रोलचे दर जाणून घेण्यासाठी SMS करता येतो. इंडियन ऑयल ग्राहक RSP-डीलर कोड-92249 9 2249 वर मेसेज करू शकतो. बीपीसीएल  RSP-डीलर कोड- 9223112222 वर मेसेज करू शकतो. एचपीसीएल ग्राहक HPPRICE-डीलर कोड- 9222201122 इथे मेसेज करू शकतो.

या ऑइल कंपन्यांचे अॅपही आहेत. त्यामार्फतही पेट्रोल - डिझेलचे भाव कळू शकतात. इंडियन ऑयलचं Fuel@IOC, बीपीसीएल ग्राहक SmartDrive अॅप, तर एचपीसीएलचं My HPCL अशी अॅप्स आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात रस्त्याला गेले तडे, हायवे खचण्याची भीती?

याशिवाय ऑइल कंपन्यांच्या वेबसाइट्स आहेत. इंडियन ऑयलचीवेबसाइट www.iocl.com, बीपीसीएलची वेबसाइट www.bharatpetroleum.com, एचपीसीएलची  www.hindustanpetroleum.com इथेही तुम्हाला रोजचे दर कळू शकतात.

सकाळी 6 वाजता ठरतात दर

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

VIDEO: गंगापूर धरण 80 टक्के भरलं; सोमेश्वर धबधबा खळखळला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Jul 29, 2019 11:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading