सोन्या-चांदीचे भाव स्थिर, 'हे' आहेत गुरुवारचे दर

सोन्या-चांदीचे भाव स्थिर, 'हे' आहेत गुरुवारचे दर

Gold, Silver - सोन्या-चांदीच्या दरात फारसे बदल झालेले नाहीत. आज किमती स्थिर राहिल्यात

  • Share this:

मुंबई, 25 जुलै : आंतरराष्ट्रीय बाजारातल्या चढउताराप्रमाणे सोन्या-चांदीच्या भावात बदल होत असतात. काल ( 24 जुलै ) सोनं महागलं होतं. आज गुरुवारी ( 25 जुलै ) सोनं महागलं नाही, पण सोन्या-चांदीच्या भावात काहीच बदल झालेले नाहीत. किमती स्थिर आहेत. दिल्ली सराफा बाजारात सोनं 35,870 रुपये प्रति 10 ग्रॅम झालंय. तर चांदी 350 रुपयांनी वाढून 42,300 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्या-चांदीच्या दरात फार थोडे बदल झालेत. न्यूयाॅर्कमध्ये सोनं 1,426.60 डॉलर प्रति औंस झालंय तर चांदी 16.59 डॉलर प्रति औंस झालीय.

2 लाख रुपयात सुरू करा 'हा' व्यवसाय आणि महिन्याला कमवा 50 हजार

दिल्लीत काल 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 150 रुपयांनी वाढून ती 35,870 रुपये झाली. तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 35,700 रुपये झाली. आजही तोच दर कायम आहे. चांदी 350 रुपयांनी वाढून 42,300 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. साप्ताहिक डिलिवरी चांदीत 511 रुपयांची तेजी आलीय. तिचा दर 41,546रुपये प्रति किलोग्रॅम राहिला.

चांदीचा सिक्का लिवाली आणि बिकवाली क्रमश: 85 हजार आणि 86 हजार रुपये प्रति शेकडा आहे.

सायन्स ग्रॅज्युएट्सना राज्याच्या प्रकल्पात मोठी व्हेकन्सी,असं असेल कामाचं स्वरूप

पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

खासगी कंपनीतही मोठी पगारवाढ, 'या' कंपन्यांसाठी आहे खूशखबर

यंदाच्या दिवाळीत सोन्याचे दर तेजीत असण्याची शक्यता मुंबईतील सराफा बाजारात व्यक्त केली जात आहे. दिवाळीपर्यंत सोने 38 हजारावर जाण्याची शक्यता आहे. तर चांदीचे दर 45 हजारावर पोहोचू शकतात.

सचिन अहिर यांच्या खेळीवर अजित पवार संतापले, पाहा हा VIDEO

Published by: Sonali Deshpande
First published: July 25, 2019, 7:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading