Elec-widget

सोन्याच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या 24 कॅरेटचे आजचे भाव

सोन्याच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या 24 कॅरेटचे आजचे भाव

जगात भारत हा सोन्याचा सर्वाधिक वापर करणारा देश असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या चढ उताराचा भारतातल्या मार्केटवर लगेच परिणाम होत असतो.

  • Share this:

नवी दिल्ली 14 नोव्हेंबर :  आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवरही झालाय. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासूनचे सोन्याचे भाव चढेच आहेत. चीन आणि अमेरिकेचं ट्रेड वॉर, हाँगकाँगमध्ये असलेली अस्वस्थता यामुळे गुंतवणूकदारांचा कल हा सोन्याकडे असल्याने फक्त सोन्याच्याच नाही तर चांदीच्याही भावांमध्ये वाढ झालीय. जगात भारत हा सोन्याचा सर्वाधिक वापर करणारा देश असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या चढ उताराचा भारतातल्या मार्केटवर लगेच परिणाम होत असतो.

दिल्लीत 10 ग्राम सोन्याची किंमत 38,980 रुपयांनी वाढून ती  38,995 रुपयांवर गेलीय. 10 ग्रामसाठी बुधवारी दिल्लीत सराफा बाजारात सोन्याची किंमत 225 रुपयांनी वाढून 38,715 रुपयेजाली होती.  तर मंगळवारी सोनं 38,490 रुपयांवर स्थिर होतं.

VIDEO ... आणि सलमान खानच्या तोंडातून निघाली आग!

कसं ओळखायचं अस्सल सोनं?

दातांची टेस्ट - तुम्ही दातांमध्ये सोनं दाबून ठेवलंत तर ते खरं असेल तर दातांवर निशाणी दिसेल. सोन्याचे दागिनेही 24 कॅरेटचे तयार करत नाहीत. त्यात इतर धातू मिसळावे लागतात.

Loading...

पाण्याची टेस्ट - आणखी एक सोपी पद्धत म्हणजे पाण्याची टेस्ट. त्यासाठी एका खोल भांड्यात 2 ग्लास पाणी टाका आणि त्यात सोन्याचे दागिने बुडवा. सोनं तरंगलं तर ते खरं नाही. ते खाली गेलं तर खरं आहे, समजावं.

क्रिकेटच्या एका प्रश्नामुळे अजित कुमारांनी गमावले 7 कोटी! बघा तुम्हाला येतं का?

सिरॅमिक थाळी - बाजारातून पांढऱ्या रंगाची ही थाळी आणा. सोनं त्या थाळीवर घासा. थाळी काळी पडली तर समजा सोनं खोटं आहे आणि चांगले रंग थाळीवर चढले तर ते सोनं असली आहे.

चुंबक टेस्ट - तज्ज्ञांच्या मते दुकानातून चुंबक घ्या आणि सोन्याच्या दागिन्यांवर लावा. सोनं त्यावर चिकटलं तर ते असली नाही. चिकटलं नाही तर ते अस्सल सोनं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2019 05:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...