दुसऱ्या दिवशीही सोनं झालं स्वस्त, 'हा' आहे 10 ग्रॅमचा भाव

दुसऱ्या दिवशीही सोनं झालं स्वस्त, 'हा' आहे 10 ग्रॅमचा भाव

Gold Price, Silver Price - परदेशात बाजारात सोन्याच्या भावात तेजी असली तरी भारतात घसरण पाहायला मिळाली

  • Share this:

मुंबई, 02 जुलै : परदेशात बाजारात सोन्याच्या भावात तेजी असली तरी भारतात घसरण पाहायला मिळाली. दिल्ली सराफा बाजारात सोन्यामध्ये 20 रुपयांनी गिरावट होऊन सोनं 32, 120 रुपये प्रति 10 ग्रॅम झालंय. चांदीत बरीच घसरण पाहायला मिळाली. चांदी 70 रुपयांनी घसरून 38,500 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं 1,391.33 डॉलर प्रति औंस झालं तर चांदी 15.19 डॉलर प्रति औंस झाली.

10 वर्ष बँकेत पडून राहिलेल्या पैशांचं काय होतं?

सोन्याची नवी किंमत

99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 130-130 रुपयांनी घसरून क्रमश: 34,120 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 33, 950 रुपये प्रति ग्रॅमवर आलंय. शनिवारी सोनं 15 रुपयांनी घसरून 34,270 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 230 रुपयांनी वृद्धी होऊन 38, 830 रुपये प्रति किलोग्रॅम होती.

दर महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे असतील तर सुरू करा 'हा' व्यवसाय

चांदीत घसरण

काल चांदीचं 260 रुपयांनी नुकसान झालं. चांदी  38,570 रुपये प्रति किलोग्रॅम आणि साप्ताहिक डिलिवरी 295 रुपयांनी घसरण होऊन 37,157 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली. चांदीचे सिक्के 80 हजार रुपये आणि 81 हजार रुपये प्रति शेकडा कायम होते. आज ( 2 जुलै ) चांदीत घसरण झालीय. चांदी 38,500 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. चांदीच्या सिक्क्यांची किंमत 80 हजार रुपये आणि 81 हजार रुपये प्रति शेकडा  आहे.

LIC कडे तुमचे पैसे पडून तर नाहीत? घरबसल्या करा चेक

गेल्या काही दिवसात अमेरिका आणि इराणमधल्या तणावामुळेही सोन्याच्या किमती वाढत होत्या. अमेरिकेनं व्याजदरात कपात केलीय. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करणं पसंत केलं होतं. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यानं उच्चांक गाठला होता. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला. दोन दिवसांपूर्वी एससीएक्सवर प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 797 रुपयांनी वधारून 33,876 रुपये झाला होता. चांदीचा भाव प्रति किलो 843 रुपयांनी वधारून 38,147 रुपये झाला होता. पण आता पुन्हा चित्र बदलतंय. सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळालाय.

VIDEO गर्दीचा फायदा घेत खिसे कापणाऱ्या चोराला काँग्रेस कार्यकर्त्यांनी चोपलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2019 07:59 PM IST

ताज्या बातम्या