सोन्याचे दर झाले आणखी कमी; सलग पाचव्या दिवशी झाली घट

सोन्याचे दर झाले आणखी कमी; सलग पाचव्या दिवशी झाली घट

सोन्या- चांदीच्या दरात सलग पाचव्या दिवशी घट झाली आहे. जाणून घ्या बुधवारचे दर

  • Share this:

नवी दिल्ली, 11 डिसेंबर : सोन्या- चांदीच्या दरात सलग पाचव्या दिवशी घट झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या किमती (Gold Prices Today) कमी झाल्या आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅममागे 73 रुपयांनी कमी झाला. चांदीचे दरही (Silver Price Today) घटले असून किलोमागे 89 रुपयांनी चांदी स्वस्त झाली आहे. ही फार मोठी घट नसली, तरी जागतिक बाजारपेठेत उतरणारे सोन्या-चांदीचे दर आता देशातल्या बाजारपेठेत दिसू लागले आहेत.

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात सलग घट होताना दिसते आहे. बुधवारी सोन्याचा दर दहा ग्रॅमला 38,486 रुपयांवर होता. बुधवारच्या तुलनेत 73 रुपयांनी भाव कमी झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,464.8 डॉलर प्रति औंस तर चांदी 16.60 डॉलर प्रति औंस एवढी होती.

चांदीचे दरही कमी झाले आहेत. दिल्लीच्या बाजारात चांदीचा दर 44729 प्रतिकिलो होता. तो उतरून 44640 रुपये किलो एवढा झाला. चांदीच्या दरात किलोमागे 89 रुपयांची किरकोळ घट झाली.

जगभरातल्या गुंतवणूकदारांचं लक्ष सध्या अमेरिका- चीन व्यापार कराराकडे आहे. Trade deal मध्ये काय ठरते त्याप्रमाणे सोन्या- चांदीच्या भावावर त्याचा परिणाम होईल. 15 डिसेंबरपर्यंत डेडलाईन आहे.

देशात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे नियम बदलणार आहेत. हॉलमार्किंगचे नियम बंधनकारक झाले आहेत. 15 जानेवारीपासून यासंबंधी नोटिफिकेशन जारी होईल,

मागणी कमी हे आहे कारण

तीन वर्षात पहिल्यांदाच यंदा सोन्याची मागणी कमी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या रिपोर्टनुसार जगभरातून सोन्याची मागणी कमी झाली आहे.

अन्य बातम्या

नोकरी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी, आता तुमच्या हातात येऊ शकतो जास्त पगार

SBI ची कर्जे होणार स्वस्त, बँकेने घेतला मोठा निर्णय!

सावधान! 31 डिसेंबरपासून बंद होणार 2 हजारांची नोट? जाणून घ्या काय आहे सत्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2019 06:09 PM IST

ताज्या बातम्या