रुपयाची किंमत वधारल्याने सोनं झालं स्वस्त; पाहा सोन्या चांदीच्या आजच्या किमती

रुपयाची किंमत वधारल्याने सोनं झालं स्वस्त; पाहा सोन्या चांदीच्या आजच्या किमती

सोन्याच्या दरात शुक्रवारी मोठी घट झाली. 24 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅमला 232 रुपयांनी उतरला. आठवडाभरातली ही सर्वात मोठी घसरण ठरली.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : सोन्याच्या दरात शुक्रवारी मोठी घट झाली. 24 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅमला 232 रुपयांनी उतरला. आठवडाभरातली ही सर्वात मोठी घसरण ठरली. जागतिक बाजारपेठेतल्या सोन्याच्या किमतीचा हा परिणाम नसून भारतीय रुपयाचं मूल्य वाढल्याने सोन्याचे दर कमी झाले आहेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. चांदीच्या दरात किरकोळ वाढ पाहायला मिळाली.

शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅमला 38,564 रुपयांवरून 38,332 रुपये झाला. गुरुवारच्या तुलनेत हा दर 232 रुपयांनी कमी झाला.

चांदीचे दरही वाढत आहेत. गुरुवारी चांदीचे दर 44,984 रुपयांवर पोहोचले होते. हा भाव चढाच राहिला. त्यात 7 रुपयांची किरकोळ वाढ झाली. गेल्या काही दिवसात सतत उतरत असलेले सोन्याचे भाव गुरुवारी वाढले.

सोन्या-चांदीच्या दरात जागतिक बाजारपेठेत होणारी घट गुरुवारी अनेक दिवसांनी थांबली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव पुन्हा वधारले. पण त्याचे परिणाम भारतीय बाजारपेठेवर अद्याप जाणवले नाहीत. रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत थोडी वाढली असल्याने ही दरवाढ फार मोठ्या प्रमाणावर झालेली नाही.

वाचा - नवा मोबाईल घेणार असाल तर ही बातमी आधी वाचा

भारतीय बाजारपेठेत लग्नसराईमुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळेही दर पुढच्या काळात चढेच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे नियम बदलणार आहेत. हॉलमार्किंगचे नियम बंधनकारक झाले आहेत. 15 जानेवारीपासून यासंबंधी नोटिफिकेशन जारी होईल.

अन्य बातम्या

राज्यात CAB लागू करणार का? सेनेच्या भूमिकेमुळे नव्या सरकारपुढे पहिला पेचप्रसंग

'मन बैरागी'नंतर भन्साळी करणार बालाकोट एअर स्ट्राइकवर सिनेमाची निर्मिती

एका पेक्षा जास्त बँकेत खाती असतील तर सावधान, होऊ शकतं मोठं नुकसान

आता ATM कार्ड विसरलात तरी काढता येणार पैसे, जाणून घ्या स्टेट बँकेचा नवा उपक्रम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 04:41 PM IST

ताज्या बातम्या