सोन्याचे भाव वधारले, चांदीही महागली; गुरुवारचे दर इथे पाहा

सोन्याचे भाव वधारले, चांदीही महागली; गुरुवारचे दर इथे पाहा

गेल्या काही दिवसात सतत उतरत असलेले सोन्याचे भाव गुरुवारी वाढले. चांदीचे वाढही चढेच राहिले. गुरुवारचे दर जाणून घेण्यासाठी स्क्रोल करा.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 डिसेंबर : गेल्या काही दिवसात सतत उतरत असलेले सोन्याचे भाव गुरुवारी वाढले. दहा ग्रॅम सोन्याचा दर (Gold Rate Today) 71 रुपयांनी वाढला. चांदीच्या दरामध्ये मात्र वाढ कायम आहे. अमेरिकेत सेंट्रल बँक फेडरल रिझर्वने (US Federal Reserve) व्याजदरात कोणताही बदल न केल्याने जागतिक बाजारात सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे. गेले काही दिवस सतत खाली येणारा सोन्याचा भाव या निर्णयामुळे वाढला आहे. भारतातसुद्धा गेल्या पाच दिवसांपासून सोन्याचे दर सतत खाली येत होते. ते आता वधारले आहेत.

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात सलग घट होताना दिसत होती. ती आता थांबली आहे. गुरुवारी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅमला 38,564 रुपये झाला. बुधवारच्या तुलनेत हा दर 71 रुपयांनी वाढला.

चांदीचे दरही वाढत आहेत. बुधवारी चांदीचे दर किलोला 44,625 रुपये होता. तो आता 44,984 रुपयांवर पोहोचला आहे. 359 रुपयांनी चांदी वधारली आहे.

सोन्या-चांदीच्या दरात जागतिक बाजारपेठेत होणारी घट गुरुवारी अनेक दिवसांनी थांबली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव पुन्हा वधारले. पण भारतीय रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत थोडी वाढली असल्याने ही दरवाढ फार मोठ्या प्रमाणावर झालेली नाही. शिवाय भारतीय बाजारपेठेत लग्नसराईमुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळेही दर पुढच्या काळात चढेच राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देशात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे नियम बदलणार आहेत. हॉलमार्किंगचे नियम बंधनकारक झाले आहेत. 15 जानेवारीपासून यासंबंधी नोटिफिकेशन जारी होईल.

अन्य बातम्या

आर्थिक आघाडीवर मोदी सरकारला दोन मोठे धक्के, उत्पादन दर पुन्हा घसरला

बुलेट ट्रेनच्या सर्व्हेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिटाळलं

अखेर ठाकरे सरकारचं खातेवाटप; जाणून घ्या, कोणत्या पक्षाकडे कोणते खाते?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 08:11 PM IST

ताज्या बातम्या