मराठी बातम्या /बातम्या /मनी /Latent View Analytics चे शेअर दोन दिवसात 40 टक्के वधारले, तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांना सल्ला काय?

Latent View Analytics चे शेअर दोन दिवसात 40 टक्के वधारले, तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांना सल्ला काय?

latent View Analytics च्या IPO ला सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आणि 326.49 वेळा सबस्क्रिप्शन घेतले गेले. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वाधिक गुंतवणूक केलेला IPO आहे.

latent View Analytics च्या IPO ला सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आणि 326.49 वेळा सबस्क्रिप्शन घेतले गेले. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वाधिक गुंतवणूक केलेला IPO आहे.

latent View Analytics च्या IPO ला सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आणि 326.49 वेळा सबस्क्रिप्शन घेतले गेले. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वाधिक गुंतवणूक केलेला IPO आहे.

मुंबई, 25 नोव्हेंबर : लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्स (Latent View Analytics) शेअर्सची बंपर लिस्टिंग झाल्यापासून, त्यात जबरदस्त रॅली पाहायला मिळत आहे. गुरुवारी सुरुवातीच्या ट्रेडमध्ये कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांनी वाढून 65 रुपयांवर पोहोचले. अशाप्रकारे, शेअर्सनी लिस्टिंगपासून अवघ्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये सुमारे 40 टक्के परतावा (Latent View Analytics returns) दिला आहे. लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्सचे शेअर्स या आठवड्यात मंगळवारी 148 टक्क्यांच्या प्रचंड प्रीमियमसह लिस्ट झाले. IPO ची इश्यू किंमत 197 रुपये होती.

एका रिसर्च अॅनालिस्टने सांगितले की, "आउटसोर्सिंग अॅनालिटिक्स कंपन्यांना त्यांचा महसूल 50 मिलियन डॉलरच्या पुढे नेण्यात अडचणी येतात. आम्ही हे यापूर्वी MuSigma आणि Fractal Analytics च्या बाबतीत पाहिले आहे. लेटेंट व्ह्यू अॅनालिस्टिक्सचा रेव्हेन्यू गेल्या 3 वर्षांपासून स्थिर आहे. त्यामुळे यात गुंतवणुकीसाठी ((Latent View Analytics Investors) आपण आणखी वाढ होण्याची वाट पाहावी असं त्यांनी सांगितलं.

अॅनालिस्टला असा विश्वास आहे की लेटेंट व्ह्यूचे वॅल्यूएशन लिस्टिंगनंतर थोडे महाग झाले आहे. लिस्टिंग प्रॉफिट असलेल्या गुंतवणूकदारांनी स्टॉकमधून बाहेर पडावे आणि नंतर त्यांना जास्त वाढ आणि नफा मार्जिन दिसल्यास नंतर पुन्हा गुंतवणूक करावी.

Go Fashion IPO: तुमच्या खात्यात पैसे येणार की शेअर्स ते अशाप्रकारे तपासा, आज होणार अलॉटमेंट

लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्सच्या IPO ला सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आणि 326.49 वेळा सबस्क्रिप्शन घेतले गेले. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वाधिक गुंतवणूक केलेला IPO आहे. 600 कोटी रुपयांच्या या IPO ची किंमत 190 ते 197 रुपये निश्चित करण्यात आली होती.

आणखी एका अॅनालिस्टने सांगितले की, आम्ही गुंतवणूकदारांना सध्याच्या पातळीवर 50 टक्के स्टेक विकण्याची शिफारस करतो. उर्वरित 50 टक्क्यांसाठी ते शेअर 650 रुपयांच्या पातळीवर जाण्याची वाट पाहू शकतात. कंपनीचे महसूल मॉडेल स्थिर राहते. त्यामुळे, गुंतवणूकदारांना दीर्घकाळ फायदा होऊ शकतो.

स्वस्तात घरखरेदी करण्याची संधी! या तारखेला PNB विकत आहे प्रॉपर्टी, तपासा डिटेल्स

तर दुसरीकडे, GCL सिक्युरिटीज लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष रवी सिंघल म्हणाले की, या कंपनीकडे प्रचंड वाढीची क्षमता असल्याने, हा स्टॉक दीर्घकाळासाठी ठेवावा. मला विश्वास आहे की पुढील तीन वर्षांत त्याचे मूल्य किमान दुप्पट होईल.

First published:

Tags: Money, Share market