• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • मागील आठवड्यात पडझडीतही 'या' शेअर्समधून गुंतवणूकदारांनी कमावले पैसे

मागील आठवड्यात पडझडीतही 'या' शेअर्समधून गुंतवणूकदारांनी कमावले पैसे

गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 1,514.69 अंकांनी घसरून 59,306.93 वर आणि निफ्टी 443.25 अंकांनी घसरून 17,671.65 वर बंद झाला. बाजारात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण सुरूच राहिली.

 • Share this:
  मुंबई, 31 ऑक्टोबर : शेअर बाजारात (Share Market) गेल्या आठवड्यात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 1,514.69 अंकांनी घसरून 59,306.93 वर आणि निफ्टी 443.25 अंकांनी घसरून 17,671.65 वर बंद झाला. बाजारात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण सुरूच राहिली. मात्र या कालावधीत काही शेअर्स होते ज्यांनी गुंतवणूकदारांना नफा कमावून दिला. बेड लीजिंग (Baid Leasing) हा स्टॉक गेल्या आठवड्यात 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये 89 टक्क्यांनी वाढला. 5 दिवसांत हा शेअर 40 रुपयांवरून 56.80 रुपयांवर पोहोचला. शुक्रवारी तो 59 टक्क्यांच्या वाढीसह 56.80 रुपयांवर बंद झाला. या स्मॉल कॅप कंपनीचे मार्केट कॅप सध्या 67.42 कोटी रुपये आहे. भारत अॅग्री (Bharat Agri) भारत अॅग्रीचा शेअर गेल्या आठवड्यात 60 रुपयांनी वाढला. शेअरने गुंतवणूकदारांना 28.52 टक्के रिटर्न दिले आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 52 कोटी रुपये आहे. शुक्रवारी, शेअर 269.90 रुपयांवर बंद झाला. Fraud Alert : मोबाईलवर आलेला एक मेसेज खाली करु शकतो बँक अकाऊंट, काय खबरदारी घ्याल गुजरात क्राफ्ट ( Gujarat Craft Industries) गुजरात क्राफ्टच्या स्टॉकने गेल्या आठवड्यात 27.02 टक्के परतावा दिला. गेल्या आठवड्यात हा शेअर 72.90 वरून रु. 92.60 वर पोहोचला. शुक्रवारी शेअर 9.26 टक्क्यांच्या वाढीसह 92.60 रुपयांवर बंद झाला. सिंगर इंडिया (Singer India) सिंगर इंडिया या शेअरने मागील आठवड्यात गुतंवणूकदारांना 33.12 टक्के रिटर्न दिले आहेत. शेअर मागील आठवड्यात 20.95 रुपयांना वाढला आणि शुक्रवारी 84.20 रुपयांवर बंद झाला. Post Office Scheme:दरमाह जमा करा 1500 रुपये, मिळवा 35 लाख; वाचा स्कीमबद्दल सर्वकाही 3 आय इन्फोटेक (3i Infotech Ltd) या शेअरमध्ये मागील आठवड्यात 6.90 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. म्हणजेच गुंतवणूकदारांना आठवडाभरात या शेअरने 21.20 टक्के रिटर्न दिले. हा शेअर सध्या 39.45 रुपयांवर आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: