मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Alert! ITR दाखल केला का? तारीख वाढवून देण्याबद्दल आयकर विभागाने दिली महत्त्वाची माहिती

Alert! ITR दाखल केला का? तारीख वाढवून देण्याबद्दल आयकर विभागाने दिली महत्त्वाची माहिती

2019-20 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर (ITR) दाखल करण्याची अंतिम तारीख (last date) आज आहे. यापुढे ही तारीख वाढणार की नाही याबद्दल आयकर विभागाने माहिती दिली आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 10 जानेवारी: कोरोना साथीमुळे आयकर विभागाने करदात्यांसाठी अनेकदा आयटीआर फाइल करण्याची तारीख वाढवून दिली होती. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख आज 10 जानेवारी रोजी आहे. 10 जानेवारीनंतर करदात्यांसाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवून दिली जाणार नसल्याचं आयकर विभागानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अद्याप आयटीआर दाखल न केलेल्या लोकांनी त्वरित आयटीआर भरावा, असा सल्ला आयकर विभागानं दिला आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी 12 वाजेपर्यंत 5,03,415 आटीआर दाखल करण्यात आले होते. तर गेल्या एक तासात 1,56,473 आयटीआर दाखल करण्यात आले आहेत.

कंपन्यांसाठी आयटीआर फाइल करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी

सरकारने वैयक्तिक करदात्यांसाठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 10 जानेवारीपर्यंत वाढवली होती. तर कंपन्यांना रिटर्न दाखल करण्यासाठी 15 फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. यासंबंधित ट्वीट करताना आयकर विभागाने म्हटलं आहे की, “2020-21 या आर्थिक वर्षासाठी 7 जानेवारी पर्यंत 5.27 कोटींहून अधिक आयकर रिटर्न दाखल करण्यात आलं आहे. आर्थिक वर्ष 2018-19 साठी आयकर रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2019 होती. त्यावेळी 5.63 कोटी रिटर्न भरले होते.

दाखल केलेल्या एकूण आयकर रिटर्नपैकी 2.8 कोटी करदात्यांनी आयटीआर -1 दाखल केला आहे. त्याचबरोबर 7 सप्टेंबर 2019 पर्यंत हा आकडा 3.1 कोटी इतका होता. 7 जानेवारी 2021 पर्यंत 1.23 कोटी आयटीआर -4 दाखल करण्यात आले आहेत. या तुलनेत 7 सप्टेंबर 2019 रोजी 1.29 कोटी आयटीआर -4 दाखल केले आहेत. ज्या करदात्याचं वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशी प्रत्येक व्यक्ती आयटीआर -1 प्रकारचा फॉर्म भरून आयटीआर दाखल करू शकतो. त्यासाठी त्याला वैयक्तिक उत्पन्नाची माहिती देणे आवश्यक असते.

First published:

Tags: Income tax, Money