Home /News /money /

RBI ची मोठी घोषणा! संकटात सापडलेली लक्ष्मी विलास बँक होणार DBS बँकेत विलीन

RBI ची मोठी घोषणा! संकटात सापडलेली लक्ष्मी विलास बँक होणार DBS बँकेत विलीन

केंद्र सरकारने मोरेटोरियम म्हणजे आर्थिक निर्बंध लादल्यानंतर आता लक्ष्‍मी विलास बँक (Laxmi Vilas Bank) डीबीएस बँक इंडिया लिमिटेड (DBS Bank India Ltd.) मध्ये विलीन होणार आहे. RBI ने ही घोषणा केली.

    मुंबई, 17 नोव्हेंबर : आणखी एक खासगी क्षेत्रातली बँक आर्थिक संकटात सापडल्यानंतर रिझर्व बँकेने (RBI) या बँकेच्या विलीनीकरणाची मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने मोरेटोरियम म्हणजे आर्थिक निर्बंध लादलेली लक्ष्‍मी विलास बँक (Laxmi Vilas Bank) आता डीबीएस बँक इंडिया लिमिटेड (DBS Bank India Ltd.) मध्ये विलीन होणार आहे. रिझर्व बँकेने केंद्र सरकारशी केलेल्या सल्ला मसलतीनंतर लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध (laxmi vilas bank under moratorium) आणले होते. 30 दिवसांसाठी हे निर्बंध (moratorium)असतील, असं सांगण्यात आलं होतं. LVB चं संचालक मंडळ (Board of Directors LVB) रिझर्व बँकेने (RBI) बरखास्त केलं होतं. कारण त्यांच्याकडे बँकेला पुनरुज्जीवन देणारा कुठलाही प्लॅन नव्हता. आता मात्र या विलीनीकरणामुळे लक्ष्मी विलास बँकेच्या खातेदारांना दिलासा मिळणार आहे. लक्ष्मी विलास बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे, असं लक्षात आल्यानंतर रिझर्व बँकेने केंद्र सरकारशी चर्चा सुरू केली. रिझर्व बँकेच्या सल्ल्याने अर्थ मंत्रालयाने यासंबंधी बँकेला नोटीस देऊन आता सरकारने या बँकेवर 16 डिसेंबरपर्यंत निर्बंध (Moratorium) आणले होते. बँक दिवाळखोरीत निघण्याच्या जवळ पोहोचू नये, यासाठी असे कठोर निर्णय आवश्यक असल्याचं सांगितलं जातं. सध्या कॅनरा बँकेचे माजी कार्यकारी अध्यक्ष टी. एन. मनोहरन यांंना लक्ष्मी विलास बँकेवर प्रशासक म्हणून नेमण्यात आलं आहे. लक्ष्मी विलास बँकेचं मुख्यालय चेन्नई इथे आहे. खासगी क्षेत्रातली महत्त्वाची बँक म्हणून LVB ओळखली जात असे. गेल्या काही महिन्यात अशा प्रकारे कारवाईवा सामोरी जाणारी LVB ही दुसरी मोठी बँक आहे. 5 मार्च 2020 ला अशाच प्रकारे येस बँकेवर (Yes Bank) निर्बंध आणले होते. पण पुढे स्टेट बँकेच्या (SBI) सहयोगाने ही बँक वाचवण्यात आली. यापूर्वी खासगी क्षेत्रातली ग्लोबल ट्रस्ट बँकसुद्धा बुडितखात्यात निघाली होती.  शेवटी ती ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये विलीन करण्यात आली. 2019 पासून LVB चा संकटकाळ सुरू झाला. इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्समध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव रिझर्व बँकेने फेटाळून लावला होता. शेअर होल्डर्सनीसुद्धा बँकेच्या संचालक मंडळातल्या बहुतांश संचालकांविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला होता.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Reserve bank of india

    पुढील बातम्या