SBI FD की पोस्ट ऑफिस बचत योजना? वाचा या नागरिकांसाठी कुठे गुंतवणूक करणं फायद्याचं

ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) विविध बँका आणि पोस्ट ऑफिसच्या काही योजना बचतीसाठी फायद्याच्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांकाडून अधिक पसंती एफडीला दिली जाते. अशावेळी जाणून घ्या कोणत्या योजना अधिक फायदा देणाऱ्या ठरतील

ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) विविध बँका आणि पोस्ट ऑफिसच्या काही योजना बचतीसाठी फायद्याच्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांकाडून अधिक पसंती एफडीला दिली जाते. अशावेळी जाणून घ्या कोणत्या योजना अधिक फायदा देणाऱ्या ठरतील

  • Share this:
    मुंबई, 15 डिसेंबर: फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit- FD) हा गुंतवणुकीचा सर्वाधिक सुरक्षित आणि हमखास रिटर्न देणारा पर्याय आहे. मात्र सध्या एफडीवरील व्याजदर कमी झाल्याने यामधील आकर्षण कमी झाले आहे. दरम्यान अद्यापही ज्येष्ठ नागरिकांची पसंती एफडीलाच आहे. यामागे जोखीम कमी आहे आणि हमखास रिटर्न ही दोन्ही कारणं आहेत. FD चा आणखी एक फायदा म्हणजे आवश्यकता भासल्यास तुम्ही यातील पैसे काढू  शकता. मॅच्यूरिटीआधी काढल्यास ग्राहकांना कमी व्याज मिळते. FD शिवाय  ज्येष्ठ नागरिक पोस्ट ऑफिसच्या (Post Office) काही योजनांमध्ये देखील गुंतवणूक करतात. जाणून घ्या देशातील सर्वात मोठी बँक असणारी SBI मधील एफडी की पोस्ट ऑफिस बचत योजना, यापैकी कोणत्या पर्यायामध्ये गुंतवणूक करणे ज्येष्ठ नागरिकांसाठी फायद्याचे असेल. SBI चा एफडीवरील व्याजदर स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ज्येष्ठ नागरिकांना 7 ते 45 दिवसात मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवर 3.40 टक्के व्याज  देत आहे. तर 46 ते 179 दिवसांनी मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवर 4.40 टक्के व्याज दिले जात आहे. 180 ते 210 दिवसांनी मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवर 4.90 टक्के व्याज SBI देत  आहे आणि 211 दिवस ते एका वर्षामध्ये मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवर 4.90% व्याज मिळते आहे. SBI च्या एक वर्ष ते 2 वर्षापर्यंत मॅच्यूअर होणाऱ्या FDवर ज्येष्ठ नागरिकांना 5.40 टक्के, 2 ते 3 वर्षापर्यंत मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवर 5.60 टक्के तर 3 ते  5 वर्षाच्या आतमध्ये मॅच्यूअर होणाऱ्या मिड टर्म एफडीवर 5.80 टक्के दराने व्याज मिळते आहे. 5 ते 10 वर्षांचा लाँग टर्म एफडीवरील व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.20 टक्के आहे. (हे वाचा-बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! चेक पेमेंट करण्याची पद्धत बदलणार) SBI प्रमाणेच अधिकतर बँका FD वर ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉइंट अधिक व्याजदर देतात. याशिवाय एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांनी बँकेच्या स्पेसल एफडी स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास 30 बेसिस पॉइंट अधिक व्याजदर देण्याचे सांगितले आहे. हा लाभ ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वर मिळेल. दरम्यान मॅच्यूरिटीआधी पैसे काढल्यास 30 बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळणार नाही. पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम्स केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस बचत योजनांच्या व्याजदरात या  तिमाहीमध्ये कोणताही बदल केला नाही आबे. PPF वर 7.10 % व्याज मिळते  आहे आणि सीनिअर सीटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS) वर 7.10% दराने व्याज मिळेल. (हे वाचा-कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात आले 2000 रुपये, तुम्हाला 'हे' स्टेटस दिसतंय?) सरकारी बाँडवर मिळणाऱ्या रिटर्नच्या आधारावर केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीच्या सुरुवातीला पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम्सचे व्याजदर अपडेट करते. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांवर 5.5 टक्क्यांपासून ते 6.7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते आहे. त्याचप्रमाणे 5 वर्षांच्या मंथली इनकम स्कीमवर 6.6 टक्के, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर 6.8 टक्के आणि आरडीवर 5.8 टक्के इंटरेस्ट मिळतो आहे. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय बेस्ट? आता 1 वर्षाच्या एफडीवर SBI 5.40 टक्के व्याज देते आहे तर पोस्ट ऑफिसमध्ये या कालावधीसाठी 5.5 टक्के व्याज मिळते आहे. 5 वर्षांनी मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवर SBI 6.2 टक्के व्याज देत आहे आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजना किंवा NSC शी तुलना केली तर हा व्याजदर खूप कमी आहे. बँकांमध्ये एफडीपेक्षा पोस्ट ऑफिसच्या बचत योजना ज्येष्ठ नागरिकांना उत्तम रिटर्न देतात. याशिवाय त्यांना टॅक्स बेनिफिट देखील मिळतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: