जाणून घ्या चुकीच्या बँक खात्यावर पैसे पाठवले तर काय करायचं?

जाणून घ्या चुकीच्या बँक खात्यावर पैसे पाठवले तर काय करायचं?

ज्या खात्यावर पैसे पाठवायचे आहेत त्याऐवजी दुसऱ्याच खात्यावर पैसे जातात. अशावेळी गोंधळून न जाता तुम्ही काही गोष्टी केल्यात तर पैसे योग्य त्या खात्यावर परत पाठवता येतात.

  • Share this:

ऑनलाइन बँकिंगच्या काळात काही क्षणात पैसे एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर पाठवले जातात. मात्र, ही सेवा जितकी सोयीची आहे तितकीच धोक्याचीही आहे. अनेकदा गडबडीत आपल्याकडून चूक होते आणि ज्या खात्यावर पैसे पाठवायचे आहेत त्याऐवजी दुसऱ्याच खात्यावर पैसे जातात. अशावेळी गोंधळून न जाता तुम्ही काही गोष्टी केल्यात तर पैसे योग्य त्या खात्यावर परत पाठवता येतात.

तुमच्याकडून चुकून असे पैसे पाठवले गेल्यास सर्वात आधी बँकेला याची माहिती फोन करून किंवा मेलवरून द्या. त्वरीत जाऊन शाखा व्यवस्थापकांची भेट घ्या. तसेच या प्रकरणात ज्या बँक खात्यावर पैसे पाठवले आहेत ती बँक हा गोंधळ मिटवू शकते. तुमच्या बँकेला चुकून झालेल्या व्यवहाराची माहिती सविस्तर द्या. यामध्ये व्यवहार केल्याची तारीख, वेळ, तुमचा खाते क्रमांक, ज्या खात्यावर पैसे चूकुन पाठवले त्या खात्याचा नंबर इत्यादी माहिती द्यावी लागेल.

ज्याला पैसे पाठवायचे त्याच्याऐवजी दुसऱ्या खात्यावर पैसे गेले असतील तर त्या बँकेच्या शाखेत जाऊन तक्रार दाखल करा. बँक त्यांच्या ग्राहकाच्या परवानगीशइवाय कोणत्याही खात्यावर पैसे पाठवू शकत नाही. तरीही बँक त्यांच्या ग्राहकांची माहितीसुद्धा देत नाही. यासाठी तुम्हाला तक्रार दाखल करताना चुकुन पैसे ट्रान्सफर झाले आहेत ते नीट समजावून सांगावं लागेल.

कोणत्याही बँकेत इंटरनेट खातं असेल तर ऑनलाइन एनईएफटी आणि आरजीएफटीच्या माध्यमातून पैसे पाठवता येतात. यावरून सुरक्षित व्यवहार होतात. यासाठी बँकेने दिलेला पासवर्ड आणि युजरनेमने लॉगइन करा. त्यानंतर ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याच्या डिटेल्स भरा. इथं दोनवेळा एकच खाते क्रमांक टाकावा लागत असल्याने चुकीच्या खात्यावर पैसे जाण्याचा प्रकार सहसा होत नाही.

Published by: Suraj Yadav
First published: December 15, 2019, 1:51 PM IST
Tags: bank

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading