मुंबई, 16 डिसेंबर : डेबिट किंवा क्रेडिट कार्ड (Credit and Debit Card) एटीएम मशीनमध्येच (ATM Machine) अडकल्याचे तुम्ही ऐकले असेल. अशी परिस्थिती कोणावरही येऊ शकते, अगदी तुमच्यासोबतही असं घडू शकेल. अशा अडचणीत येतात तेव्हा लोक खूप अस्वस्थ होतात. कारण अडकलेले कार्ड परत कसे मिळवायचे हे त्यांना माहित नसते. जर तुम्हाला कार्ड परत कसे मिळवायचे कसे हे माहित असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
या कारणांमुळे एटीएम कार्ड अडकू शकते
तुमचे एटीएम कार्ड मशीनमध्ये का अडकते हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड खालील कारणांमुळे एटीएम मशीनमध्येच अडकू शकते.
>> आपण बऱ्याच वेळानंतर आपले डिटेल्स एंटर केल्यास.
>> चुकीची माहिती एंटर केल्यासही कार्ड अडकू शकते.
>> वीज जोडणीमध्ये अडचण आल्यास व वीज गेली तर कार्ड अडकू शकते.
>> इतर तांत्रिक समस्या.
>> सर्व्हरशी कनेक्शनमध्ये समस्या असेल तर.
तुमचा पगार 15 हजारहून कमी असेल तर लगेच इथे रजिस्ट्रेशन करा; 'या' योजनेचा फायदा मिळेल
कार्ड परत कसे मिळवायचे?
जर तुमचे डेबिट कार्ड एटीएम मशिनमध्ये अडकले तर तुम्ही ताबडतोब बँकेला कळवावे. तुम्ही बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून हे कोणत्या शहरात आणि कोणत्या मशीनवर घडले आहे ते सांगावे.
जर ते एटीएम त्याच बँकेचे असेल ज्यामध्ये तुमचे खाते आहे, तर तुम्हाला तुमचे कार्ड अगदी सहज परत मिळेल. पण जर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला काही त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
कस्टमर केअर दोन पर्याय देईल
तुम्ही कस्टमर केअरला याबाबत सांगाल, तेव्हा तेथून तुम्हाला दोन पर्याय दिले जातील. पहिला पर्याय म्हणजे कार्ड रद्द करणे. तुम्ही कार्ड रद्द केल्यास, तुम्हाला पुन्हा कार्ड बनवावे लागेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कार्डचा गैरवापर होत असेल तर तुम्ही ते रद्द केले पाहिजे. कार्ड रद्द केल्यानंतर, तुम्हाला नवीन कार्डसाठी देखील अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर 7 ते 10 दिवसांत नवीन कार्ड तुमच्या घरी पोहोचेल. तुम्हाला लवकरच हवे असल्यास, तुम्ही कार्डसाठी तुमच्या बँकेच्या शाखेला भेट देऊ शकता.
दुसऱ्या बँकेच्या एटीएममध्ये कार्ड अडकवण्याचा दुसरा मार्ग आहे. खरंतर, सर्व बँका त्यांची अडकलेली कार्डे ज्या बँकांमध्ये ती कार्ड जारी केली जातात त्यांना पाठवतात. म्हणजे ज्या बँकेचे कार्ड त्याच बँकेला उपलब्ध असेल. ते कार्ड तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत मिळवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.