मराठी बातम्या /बातम्या /मनी /क्युमिलेटिव्ह आणि नॉन-क्युमिलेटिव्ह FD म्हणजे काय? कोणती गुंतवणूक जास्त फायदेशीर?

क्युमिलेटिव्ह आणि नॉन-क्युमिलेटिव्ह FD म्हणजे काय? कोणती गुंतवणूक जास्त फायदेशीर?

फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच टर्म डिपॉझिट हा गुंतवणुकीचा एक पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बँकेत किंवा फायनॅन्शिअल इन्स्टिट्युटमध्ये निश्चित कालावधीसाठी एक ठराविक रक्कम ठेवता.

फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच टर्म डिपॉझिट हा गुंतवणुकीचा एक पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बँकेत किंवा फायनॅन्शिअल इन्स्टिट्युटमध्ये निश्चित कालावधीसाठी एक ठराविक रक्कम ठेवता.

फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच टर्म डिपॉझिट हा गुंतवणुकीचा एक पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बँकेत किंवा फायनॅन्शिअल इन्स्टिट्युटमध्ये निश्चित कालावधीसाठी एक ठराविक रक्कम ठेवता.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 5 फेब्रुवारी : फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच टर्म डिपॉझिट हा गुंतवणुकीचा एक पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बँकेत किंवा फायनॅन्शिअल इन्स्टिट्युटमध्ये निश्चित कालावधीसाठी एक ठराविक रक्कम ठेवता. एफडी टेन्यूअरच्या शेवटी, तुम्ही गुंतवलेली रक्कम आणि त्यावरील चक्रवाढ व्याज तुम्हाला परत मिळते. बँकेत किंवा फायनॅन्शिअल इन्स्टिट्युटमध्ये एफडी खातं उघडल्यावर व्याजदर ठरवला जातो.

    फिक्स्ड डिपॉझिटचे प्रकार

    बँकांमध्ये एफडीचे अनेक प्रकार उपलब्ध असतात. पण, एफडीचे साधारणपणे दोन प्रकार प्रमुख आहेत. त्यांना क्युमिलेटिव्ह आणि नॉन-क्युमिलेटिव्ह एफडी असं म्हणतात. या दोन्हींची विभागणी व्याजाच्या आधारे केली जाते. नियमितपणे व्याज मिळते की मॅच्युरिटीवर व्याज मिळते, यावरून तुमच्याकडे असलेल्या एफडीचा प्रकार ठरतो.

    फायनान्स पोर्टल पैसा बाजारवर उपलब्ध माहितीनुसार, क्युमिलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे असे फिक्स्ड डिपॉझिट ज्यात मॅच्युरिटी पिरीयड संपेपर्यंतचं व्याज जमा केलं जातं. “एका वर्षात किंवा एका सायकलमध्ये मिळालेलं व्याज पुन्हा गुंतवले जातं किंवा पूर्वीच्या मूळ रकमेत जोडले जातं, त्यामुळे मूळ रक्कम वाढते. परिणामी, व्याजही वाढतं. इथं कंपाउंडिंगची पॉवर उत्तम प्रकारे वापरली जाते."

    एकदा तुमची एफडी मॅच्युअर झाल्यावर, तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम मिळेल ज्यामध्ये तुमची गुंतवलेली रक्कम व त्यावर जमा झालेलं व्याज असेल.

    नॉन-क्युमिलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिट काय असतं?

    नॉन-क्युमिलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जमा झालेले व्याज डिपॉझिटरला नियमितपणे दिलं जातं. एफडी अटींनुसार व्याज देण्याचा कालावधी मासिक, त्रैमासिक किंवा सहा महिने असा असतो. या प्रकारची एफडी गुंतवणूकदारांना नियमित पेआउट देते कारण बँका व्याज रोखत नाहीत.

    एफडीवरील व्याज मोजण्याची पद्धत

    भारतात पैसे बचतीसाठी एफडी हा एक लोकप्रिय पर्याय आहे. ही चांगल्या रिटर्नसह सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. जेव्हा तुम्ही खातं उघडता तेव्हा एफडीवरील रिटर्न निश्चित केला जातो. तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट उघडल्यानंतर व्याजदर कमी झाले तरीही, तुम्हाला सुरुवातीला ठरवलेलं व्याज मिळत राहील.

    जेव्हा तुम्ही एफडी सुरू करता तेव्हा त्यावरील व्याज दर निश्चित केले जातात आणि तुम्ही ज्या मुदतीसाठी एफडी करू इच्छिता त्यानुसार दर अवलंबून असतात. आरबीआय MPC रेपो रेट बदलल्यामुळे एफडीचे दर बदलू शकतात. काही बँका व्याजदर वाढवू शकतात, तर काही त्यांच्या सोईचे निर्णय घेऊ शकतात.

    तीन महिन्यांपेक्षा कमी दिवसांत बँकेला परत करावी लागणारी डिपॉझिट्स किंवा टर्मिनल क्वार्टर अपूर्ण असलेली डिपॉझिट्स अशा डिपॉझिट्सवरील व्याज ठरवताना डिपॉझिट ठेवल्याचे दिवस आणि वर्षाचे 365 दिवस यांच्या प्रमाणानुसार व्याज कॅल्क्युलेट करावं, असं द इंडियन बॅक्स असोसिएशनने आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केलं आहे.

    काही बँका लीप वर्षात 366 दिवस आणि इतर वर्षात 365 दिवसांचं वर्ष मोजण्याची पद्धत अवलंबत आहेत. बँका त्यांच्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास स्वतंत्र आहेत. त्यामुळे डिपॉझिटर्सना त्यांनी व्याजाची योग्य मोजणी करण्याच्या पद्धतीबद्दल माहिती द्यायला पाहिजे. तसेच ती त्यांच्या ब्रांचेसमध्ये डिस्प्ले देखील करायला पाहिजे. जर एफडी मॅच्युअर झाली आणि पैसे मिळण्यासाठी मागणी केली नसेल, तर बँकेकडे दावा न केलेली रक्कम पडून राहील. त्यावर सेव्हिंगचे व्याज दर लागू होतील.

    keywords-

    First published: