मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बँकेत FD करण्याआधी RBIने बदललेले नियम जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान

बँकेत FD करण्याआधी RBIने बदललेले नियम जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान

आरबीआयने फिक्स्ड डिपॉझिटच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे की आता मुदतपूर्तीनंतर, जर तुम्ही रकमेवर दावा केला नाही तर तुम्हाला त्यावर कमी व्याज मिळेल.

    मुंबई, 12 ऑगस्ट : बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करणे हा गुंतवणुकीचा सर्वात सुरुक्षित पर्याय मानला जातो. तुम्हीही फिक्स्ड डिपॉझिट करत असाल तर FD च्या नियमात मोठा बदल झाला आहे ज्याची माहिती तुम्हाला असायला हवी. आरबीआयने काही काळापूर्वी एफडीशी संबंधित नियम बदलले आणि नवीन नियम लागू झाले आहेत. आरबीआयच्या रेपो दरात वाढ करण्याच्या निर्णयानंतर अनेक सरकारी आणि गैर-सरकारी बँकांनीही एफडीवरील व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एफडी करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा. अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. एफडीच्या मॅच्युरिटीचे नियम बदलले आरबीआयने फिक्स्ड डिपॉझिटच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे की आता मुदतपूर्तीनंतर, जर तुम्ही रकमेवर दावा केला नाही तर तुम्हाला त्यावर कमी व्याज मिळेल. हे व्याज बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाइतके असेल. सध्या, बँका 5 ते 10 वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या FD वर 5% पेक्षा जास्त व्याज देतात. तर बचत खात्यावरील व्याजदर सुमारे 3 ते 4 टक्के आहे. रेपो दरवाढीचा अनेकांना फायदा; 'या' दोन बँकांनी आपल्या FD व्याजदरात केली वाढ आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, जर एफडी मॅच्युअर झाली आणि त्यावर दावा केला गेला नाही, तर बचत खात्यानुसार त्यावर व्याज दर किंवा मॅच्युअर एफडीवर निश्चित केलेला व्याजदर, यापैकी जे कमी असेल ते दिले जाईल. सर्व व्यावसायिक बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांमधील ठेवींवर हे नवीन नियम लागू होतील. करदात्यांना मोठा झटका, सरकारने अटल पेन्शन योजनेत केले बदल पूर्वी, जेव्हा तुमची FD मॅच्युअर झाली आणि तुम्ही ती काढली नाही किंवा दावा केला नाही, तर बँक तुमची FD त्याच कालावधीसाठी वाढवत असे ज्यासाठी तुम्ही आधी FD केली होती. पण आता असे होणार नाही. आता जर मुदतपूर्तीवर पैसे काढले नाहीत तर त्यावर एफडीचे व्याज मिळणार नाही. त्यामुळे मॅच्युरिटीनंतर लगेच पैसे काढले तर बरे होईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Fixed Deposit, Money, Rbi

    पुढील बातम्या