Home /News /money /

Petrol Diesel Price Today: गेल्या 2 वर्षात आज सर्वाधिक महागलं पेट्रोल-डिझेल, वाचा तुमच्या शहरात काय आहेत दर

Petrol Diesel Price Today: गेल्या 2 वर्षात आज सर्वाधिक महागलं पेट्रोल-डिझेल, वाचा तुमच्या शहरात काय आहेत दर

आज पेट्रोलच्या किंमतीत 20 पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत 23 पैशांनी वाढ झाली आहे. यानंतर इंधनवाढ गेल्या 25 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर आहे.

    नवी दिल्ली, 04 डिसेंबर: सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा आज पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये  (Petrol Diesel Price Today)वाढ केली आहे. आज पेट्रोलच्या किंमतीत 20 पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत 23 पैशांनी वाढ झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी पेट्रोलचे भाव 82.86 रुपये लीटर तर डिझेलचे भाव 73.07 रुपये प्रति लीटर झाले आहेत. मुंबईमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 89.52 रुपये 79.66 रुपये प्रति लीटर आहेत. मध्य प्रदेशमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव सर्वाधिक आहेत. याठिकाणी पेट्रोल 90.62 रुपये तर डिझेल 80.83 रुपये प्रति लीटर आहेत. यानंतर इंधनवाढ गेल्या 25 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर आहेत. या कारणामुळे वाढत आहेत इंधन दर यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये ऐतिहासिक घसरण झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र केंद्र सरकारने सामान्यांना झटका दिला. सरकारने पेट्रोलवर 10 रुपये आणि डिझेलवर 13 रुपये प्रति लीटरने उत्पादन शुक्ल आणखी वाढवले. याआधी 2014 मध्ये पेट्रोलवरील टॅक्स 9.48 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 3.56 रुपयांने वाढवले होते. नोव्हेंबर 2014 ते जानेवारी 2016 पर्यंत केंद्र सरकारने या दरात 9 वेळा वाढ केली आहे. दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. तपासा देशातील मोठ्या शहरांमध्ये काय आहेत पेट्रोल डिझेलचे आजचे दर दिल्ली- पेट्रोल 82.86 रुपये आणि 73.07 रुपये लिटर आहे. मुंबई- पेट्रोलचे दर 89.52 रुपये आणि डिझल 79.66 रुपये लिटर आहे. कोलकाता- पेट्रोल 84.37 रुपये आणि डिझल 76.64 रुपये लिटर. चेन्नई- पेट्रोल 85.76 रुपये आणि डिझलचे दर 78.45 रुपये लिटर आहे. कसे तपासाल नवे दर? पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही जर इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या