मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Shyam Metalics IPO: कमाईची खास संधी! 14 जून रोजी केवळ 303 रुपये गुंतवून मिळवा चांगला नफा

Shyam Metalics IPO: कमाईची खास संधी! 14 जून रोजी केवळ 303 रुपये गुंतवून मिळवा चांगला नफा

तुम्ही जून महिन्यात चांगली कमाई करण्यासाठी पर्यायांच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कोलकातातील स्टील उत्पादक कंपनी श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेड (Shyam Metalics And Energy Limited) तुम्हाला ही संधी देत आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 08 जून: तुम्ही जून महिन्यात चांगली कमाई करण्यासाठी पर्यायांच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कोलकातातील स्टील उत्पादक कंपनी श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेड (Shyam Metalics And Energy Limited) तुम्हाला ही संधी देत आहे. ही कंपनी शेअर बाजारात आयपीओ (IPO) दाखल करत आहे. त्यातून  पहिल्याच दिवशी चांगली कमाई होऊ शकते. कंपनीने आयपीओसाठी प्राईस बॅण्ड (Price Band) निश्चित केला आहे.

स्टील उत्पादक कंपनी श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी 14 जूनला आपली 909 कोटींची इनिशिअल पब्लिक ऑफर (IPO)  दाखल करीत आहे. या इश्यूसाठी 303 ते 306 रुपये प्रतिशेअर असा प्राइसबँड ठरवण्यात आला आहे. 14 ते 16 तारखेदरम्यान यात पैसे गुंतवू शकता. अँकर गुंतवणूकदारांसाठी 11 जून रोजी आयपीओ खुला होईल.

ओएफएसच्या (OFS) माध्यमातूनही होईल विक्री

कंपनीचा सार्वजनिक इश्यू 657 कोटींचा असेल. तर ऑफर फॉर सेलसाठी कंपनी 252 कोटी रुपयांचे शेअर विक्रीसाठी सादर करेल. पात्र कर्मचाऱ्यांना अंतिम सादरीकरण मूल्यावर प्रतिशेअर 15 रुपयांची सूट दिली जाईल. विक्रीच्या ऑफरमध्ये शुभम कॅपिटलद्वारे 37 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री, सुभम बिल्डवेलच्या 63 कोटी, कल्पतरु हाउसिंग अँड ट्रेडिंगच्या 25 कोटी, डोराईट ट्रॅकॉनच्या 30 कोटी आणि नारंतकच्या 97 कोटी रुपयांच्या शेअर्स विक्रीचाही समावेश आहे.

हे वाचा-खूशखबर! घरभाडं भरणाऱ्यांसाठी Paytm ची खास ऑफर, मिळेल 10000 रुपयांपर्यंतचा फायदा

फंड कुठे वापरला जाईल

- आयपीओच्या माध्यमातून जमा झालेल्या 657 कोटी रुपयांचा वापर कंपनी आणि तिची सहयोगी कंपनी SSPL च्या कर्ज परतफेडीसाठी करणार आहे.

- या आयपीओसाठी श्याम मेटॅलिक्सने ICICI Securities, अॅक्सिस कॅपिटल, IIFL Securities, जे.एम. फायनान्शिअल आणि एसबीआय कॅपिटल यांना आपले लीड मॅनेजर (Lead Manager) म्हणून नियुक्त केले आहे.

कंपनीचा व्यवसाय कसा आहे?

या स्टील उत्पादक कंपनीचे ओडीशातील संबलपूर, पश्चिम बंगालमधील जमुरिया आणि मंगलपूर असे 3 कारखाने आहेत. कंपनीनं 13 राज्यं आणि एक केंद्रशासित प्रदेश यामध्ये 42 वितरकांची टिम (Team) स्थापन केली आहे.

कंपनीवर कर्ज किती आहे?

कंपनीवर एकूण 381.12 कोटी रुपयांचे कर्ज आहे. तसेच या कंपनीच्या सहयोगी कंपनीवर 398.60 कोटी रुपयांचे कर्ज असून, कंपनीवर एकूण 886.29 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

हे वाचा-6 कोटी PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! हे काम पूर्ण न केल्यास मिळणार नाहीत पैसे

नफा किती झाला?

- 2020-21 या आर्थिक वर्षातील डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल (Revenue) 3933.08 कोटी रुपये होता.

- मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा एकूण महसूल 3283.09 कोटी रुपये होता.

- श्याम मेटॅलिक्सला डिसेंबरच्या तिमाहीत 456.32 कोटींचा निव्वळ नफा झाला.

- मागील अर्थिक वर्षातील तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा (Net Profit) केवळ 260.36 कोटी रुपये होता.

First published:

Tags: Investment, Money